महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे.त्यास छत्रपती शिवराय आणि फुले शाहू आंबेडकर या महा मानवांची वैचारिक परंपरा आहे.हे सारे “बोलायचा भात आणि बोलायची कढी” असेच झाले आहे.आदिलशाही आणि निजामशाहीत उध्वस्त झालेल्या महाराष्ट्राला, नवी गावे गावठाण वसवून विकासाचे “गाव गावठाण” हेच एकक आहे. हे सागितले होते.एवढेच नाही तर भूमिहीन बारा बलुतेदार या रयतेचे स्वराज्य आहे. हे देखील त्यांनीच सागितले.त्यामुळे तेहतीस कोटी देव एका बाजूला ठेवले आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवराय बसविले तरी पारडे हे छत्रपतींचेच वजनदार राहील.हे महाराष्ट्रातील धार्मिक राजकीय सामाजिक वास्तव प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सागितले आहे.
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई यांचे लक्ष गाव खेड्यात राहणारा स्त्रिशुद्रातीशूद्र हाच होता.उच्च वर्णीय जातींनी मानवी अधिकार म्हणजे शिक्षण,शेती जमीन जंगल पाणी नाकारलेला खेड्यातील कष्ठकरी आहे हेच दाखविले आहे.ब्राम्हण क्षत्रिय वैश्य हे मनुस्मृतीच्या धार्मिक आरक्षणाने माजलेले घोडे शोषित दुबळ्या स्त्रिशुद्रातिशुद्र जनतेस अर्थात दुबळ्या घोड्यास काही खाऊ देणार नाहीत?.म्हणून सरकारी नोकऱ्या आरक्षणाने देणारे छत्रपती शाहू महाराज हे समतेचे गावखेड्यातील गरिबांचे उद्धारक होते.देवा ब्राम्हणांना न जमलेला न्याय,या महान राजाने केला. म्हणूनच छत्रपती शिवराय आणि छत्रपती शाहू महाराज हे दोन्ही राजे लोकशाही न्याय बंधुता समता माननाऱ्या, सविधांनकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीतील आदरार्थी राजे मानले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तर घरे गावठाण जमिनी पाणी जंगल शिक्षण शाळा आरक्षण यांची आदोलने करून,देशातील उच्चजातीय नगरात राहणाऱ्या उच्च जातीय ब्राह्मन लोकांनी लादलेली विषमता उघड केली.खेड्यात राहणाऱ्या अस्पृश्य आदिवासी एससी एसटी आणि ओबीसी जातींच्या अन्याय अत्याचारांची प्रकरणे जगासमोर आणून त्यांना न्याय आणि कायदेशीर सुरक्षा देणारे भारतीय संविधान या भारतास दिले.देशाच्या विकासाची दिशा,गाव खेड्यातील स्थितीशिल झालेल्या,मनुस्मृतीच्या विषमतेचे चटके सोसणाऱ्या, बहुसंख्य पंच्याऐशी टकके समाजाला पुढे आणणे हेच त्यांचे ध्येय होते.
आज देशाच्या विकासाची दिशा ही गुजरात केंद्री उद्योजक अदाणी अंबानी यांच्या उत्कर्षाचा परंमबिंदू गाठणारी झालीय.देशातील मागासवर्गीय जनतेचा खिसा कापून उभी राहिलेली नोटबंदी आणि कोरोना महामारी कुणास मारक ठरली?.हे सांगणारी महाराष्ट्राची बुद्धी ऐन दिवाळीत दिवाळखोरिकडे वाटचाल करते की काय?असे म्हणायची वेळ आली आहे.२०१६ -१७ मध्ये मुंबई चे मालक असलेल्या आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडीयन आदिवासी यांची गावठाण ही गलिच्छ(SRA) आहेत.असे महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांनी जाहीरपणे म्हंटले हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलाबा कोळीवाड्याचे नियोजन ज्या राज्यकर्ते आणि मंत्रालयातील प्रशासक वर्गाला जमले नाही?. ते किती मूर्ख, अपयशी असतील? हे फक्त आम्हा सागरपुत्र आरमारी लोकांना माहीत आहे.वरळीच्या समस्त मच्छीमारांच्या सभेत जयेश आक्रे यांच्या उपस्थितीत आमदार आशिष शेलार (भाजपा) यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.यातून हेच सत्य समोर आले. मुंबई महापालिका ही केवळ रस्त्यावरील खड्डे पडले म्हणून बदनाम नाही ?.तर दोनशे कोळीवाडे गावठाण यांचे नियोजन करण्यात अपयशी ठरलेली जगातली सगळ्यात श्रीमंत परंतु बुध्दीने भिकारडी महानगर पालिका आहे.
नवी मुंबई महानगर पालिका आणि सिडकोलाही येथील आगरी कोळी ओबीसी गावठाण विस्तार आणि नियोजन करता आलेले नाही.ठाणे कल्याण डोबिवली पालघर वसई या महा मुंबई क्षेत्रात महाराष्ट्र शासनास मोठे अपयश आले आहे.शहरांचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्या सिडकोने इथल्या आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार मागासवर्गीयांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून पोलिसी बलात्काराने घेतलेल्या जमिनिं कमी पडल्या? म्हणून हजारो वर्षे जुनी आमची गावठाण अनधिकृत ठरवून? तेथील मालकीची घरे आता सिडकोशी भाडे करार करून, देण्याची तुघलकी भाषा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठा) करीत आहेत.या सर्व मागासवर्गीय शोषणात,मराठा ब्राह्मन वैश्य जमीनदारी शोषक जातींचे स्वभाव लोकशाहीतही बदललेले नाहीत?.हेच सत्य समोर येते.वाईट याचे वाटते आमच्या महापुरुषांनी केलेले लोक प्रबोधन वाया गेले का?
आमच्या घर गावठाण कोळीवाडे यांचे मूळ गावठाण आणि आता सत्तर वर्षात वाढलेल्या लोक संख्येनुसार विस्तारित गावठाण, आवश्यक सोयी सुविधांचा विचार करून नवे नकाशे लोकवर्गणी काढून करणे,ही आम्हा गावकऱ्यांची जबाबदारी होती.
आम्ही आमच्यातील कामचुकार आणि कायद्याने अज्ञानी ठरलेल्या ग्रामपंचायत सदस्य,सरपंच, ग्रामसेवक तसेच महानगर पालिकेतील नगरसेवक,महापौर यांच्यावर विसंबून राहिल्याचा दुष्परिणाम भोगत आहोत.आज तेही मोठ्या मनाने आपल्या ऐतिहासिक घोडचूका कबूल करीत नाहीत.आमदार आणि मंत्री यांचे पाय जणू जमिनीवर नाहीतच?
इंग्रज सत्ता काळात भारताचा सर्वे,मोजणी नकाशा झाला.तोच मूळ गाव गावठाण नकाशा आपल्याकडे उपलब्ध आहे.विस्तारित गावठाण जे नैसर्गिक लोकसख्या वाढीनुसार न्यायाचे आहे.हे भारतीय प्रशासन लोकप्रतिनिधी नी नाकारले जाणे ?.म्हणजे आमच्या सर्व पक्षीय नेतृत्वाचा अक्षम्य पराभव आहे.भारतीय राजकाणातील ब्राह्मन क्षत्रिय वैश्य या उच्च वर्णीय मनुवादी जाती मागासवर्गीय लोकांचे शोषण करणे. यालाच “शासन” म्हणतात.याचाच अर्थ त्यांची लोककल्याणकारी शासन व्यवस्था साभाळण्याची लायकी नाही. हे निदान आगरी कोळी ओबीसी लोकांच्या लक्षात आले असेल.”शितावरून भाताची परीक्षा” याप्रमाणे ज्यांना गावठाण नियोजन जमत नाही?.त्यांनी हिंदुराष्ट्र बनविण्याच्या पोकळ घोषणा करू नयेत. भारतीय संविधान मानणाऱ्या मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांनी या अपयशी ,मूर्ख , सत्ताधारी लोकांना खाली खेचून देशाची राजकीय सत्ता हाती घ्यावी.
जय भारत!
✒️सुलोचना पुत्र:- राजाराम पाटील(केगाव उरण जिल्हा रायगड)मो:-८२८६०३१४६३