सेवानिवृत्त जवान प्रभाकर चाफळे यांचा महातपुरी ग्रामस्थांकडून जंगी स्वागत

43

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7नोव्हेंबर):-महातपुरी गावचे सुपुत्र श्री प्रभाकर मोतीराम चाफळे हे सीमा सुरक्षा बलामध्ये 35 वर्षे सेवा करून आपल्या सेवापुर्तीला पूर्णविराम देऊन आपल्या गावी आले असता समस्त महातपुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा परळी नाका ते महातपुरी गावापर्यंत मोटर सायकल रॅली काढून स्वागत व सत्कार समारंभ महातपूरी ग्रामपंचायत येथे पार पडला देशाचे जवान प्रभाकर मोतीराम चाफळे यांनी तरुणांना देश सेवा करण्याची प्रेरणा देऊन आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी 1988 साली बंगलोर येथे सीमा सुरक्षा बलामध्ये रुजू होऊन देश सेवेला सुरुवात केली.

त्यांनी देशातील हरियाणा,पंजाब,मेघालय,कश्मीर, राजस्थान,नागालँड,आसाम, त्रिपुरा, गुजरात,मणिपूर,बंगाल या राज्यामध्ये आपली देशसेवा पूर्ण केली आहे व आज दिनांक 31 ऑक्टोबर या दिवशी सहाय्यक उपनिरीक्षक या पदावरून वयाची 35 वर्षे सेवा करून सेवानिवृत्ती घेतली महातपुरी ग्रामस्थांच्या वतीने गावातील मुख्य रस्त्यावरून फुलांनी सजवलेल्या गाडी वरून देशभक्ती गीते लाऊन जवानांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानकर सर,सचिन सुरवसे यांनी केले व आभार प्रदर्शन शेख अमजदभाई यांनी केले