भजन सम्राट अनुप जलोटा आणि प्रसिद्ध युवा गायक श्रीवल्लीफेम जावेद अली यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 14वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार जाहीर

19

✒️विशेष प्रतिनिधी(स्नेहा उत्तम मडावी)मो:-7447505526

पुणे(दि.8नोव्हेंबर):- रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सांगीतिक क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाच्या वर्षी भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा आणि प्रसिद्ध पार्श्वगायक श्रीवल्लीफेम जावेद अली यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येकी एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे 14वे वर्ष आहे.

यावेळी विश्वस्त राहुल देशपांडे, संदीप राक्षे, सौरभ वाटवे, विवेक थिटे उपस्थित होते.पुरस्कार वितरण आदरणीय शरद पवार यांच्या हस्ते दि. 2 डिसेंबर 2022 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार आहे. *पुढला पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या दोन महिलांना दिला जाणार असल्याचे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.*