चोपडा महाविद्यालयात रंगणार आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा

28

✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चोपडा(दि.8नोव्हेंबर):- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व एरंडोल विभाग क्रीडा समिती मारवड अंतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथे दि.१० व ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी ‘आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धांचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उदघाटक म्हणून डॉ.निर्मल आनंदराज टाटिया हे उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.नीता दुर्गेश जयस्वाल, सौ.सपना निर्मल टाटिया तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील त्याचप्रमाणे कै. म.तु.पाटील महाविद्यालय, मारवाड येथील एरंडोल क्रीडा समितीचे सचिव डॉ.देवदत्त पाटील, विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या क्रीडा स्पर्धेमध्ये एरंडोल विभाग परिक्षेत्रातील महाविद्यालयीन पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेचे आयोजन व नियोजन महाविद्यालयाच्या जिमखाना विभाग प्रमुख सौ. क्रांती क्षीरसागर तसेच समिती समन्वयक डॉ. एस.आर. पाटील व सर्व समिती सदस्य यांनी केले आहे.