विजय परिवर्तनाचा आहे,उद्याचा गुलाल विजय बनसोडेच घेणार : बळवंत पाटील

14

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18नोव्हेंबर):- सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या शिक्षक बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासद परिवर्तन पॅनेलच्या माण तालुक्यातील म्हसवड मतदारसंघ संघातील उमेदवार विजय बनसोडे यांच्या नावाची चर्चा त्यांनी केलेल्या कामामुळे होत आहे त्यांनी शिक्षक बंधू बरोबर सामान्य माणसांची केलेली कोणत्या ना कोणत्या रुपात केलेली मदत, परमेश्वरा सारखे धावून आले व आमची कामे केली असे मला अनेक लोक भेटून सांगत आहेत तर काही फोन करून म्हणत आहेत आम्ही बनसोडे सरांच्या बरोबर आहोत हिच बनसोडे यांच्या विजयाची नांदी आहे उद्या सातारवरुन येताना विजयाचा गुलाल घेऊनच यांचा आहे असे आज तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो असे म्हणून शेवटी म्हणाले आज उद्या फक्त दक्ष रहा, जागृत रहा , उलटे सुलटे काही होणार नाही मतदारांनाच मनावर घेतले आहे त्यांना पुन्हा घरी जाऊन भेटी द्या असे माजी चेअरमन बलवंत पाटील यांनी सांगितले

प्राथमिक शिक्षक बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासद परिवर्तन पॅनेलच्या प्रचारार्थ माण तालुक्यातील म्हसवड मतदारसंघाचे उमेदवार विजय बनसोडे यांच्या प्रचारासाठी म्हसवड येथे आले असताना शिक्षकांना मार्गदर्शन करताना बलवंत पाटील म्हणाले बनसोडे सरांनी पाच वर्षात शिक्षकांच्या अडचणी सेवानिवृत्तीच्या जेष्ठ शिक्षकांची कामे त्या बरोबर सामान्य माणसाचा आधार बनलेले बनसोडे सरांच्या दांडगा जनसंपर्क, बॅकेच्या कामाचा अभ्यास शिक्षकांच्या अडचण सोडवण्यासाठी कामी येणार आहे शिक्षक बंधू यांनी त्यांच्या कामाची पोचपावती मताच्या रुपात देण्यासाठी मतदारांच्या घरी जाऊन भेटी घ्या विजय बनसोडे कोठे कमी पडणार नाहीत विजय परिवर्तनचा आहे त्या विजयाचा गुलाल विजय बनसोडेच घेणार आहेत काळजी करु नका फक्त गाफील राहु नका दक्ष रहा असे पाटील म्हणाले

यावेळी माजी संचालक लक्ष्मण काळे,राकेश ओतारी, धनाजी पोळ, सुरज तुपे, नंदकुमार तुपे, सतिश कुंभार, सुशील त्रिगुणे, शशी गायकवाड, प्रकाश ढोक, काशिनाथ तोरणे, प्रमोद मंगरुळे, आर के खाडे, विठ्ठल बागल, शंकर मडके, अतुल यादव, सतीश काळेल, योगेश काळंगे,विठ्ठल शिंदे, शशी खाडे, विठ्ठल जाधव, ज्ञानदेव जाधव, विनोद आटपाडकर,चंद्रकांत जाधव, मनोज डुबल आदी शिक्षक उपस्थित होते