श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

14

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.20नोव्हेंबर):- सिध्दनाथ नाथ महाराजाचं चांगभलं,
नाथबाबांच्या नावानं चांगभलं च्या गजरात शेकडो श्री सिध्दनाथ महाराजांच्या भक्तांच्या उपस्थित सिध्दनाथ जोगेश्वरी मुर्तीवर फुलांचा वर्षाव करुन फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये बुधवारी रात्री नऊ वाजता श्रीचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

म्हसवड येथील श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिरामध्ये काल बुधवारी श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने काल दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सांयकाळी मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई पणत्या व मेणबत्ती लावून सजावट करण्यात आली होती मंदिर परिसरात असलेल्या तिस ते चाळीस फुट उंची असलेल्या दगडी दिपमाळ (डिंकमल) पटवण्यात आली होती तर कार्तिक विभुते या विद्यार्थ्यांने काळभैरवाचे आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.

रात्री साडे आठ वाजता श्रीची आरती सुरू होऊन रात्री नऊ पर्याय संपल्यावर उपस्थीत नाथ भक्तांनी श्रीच्या मुर्तीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी सालकरी गणेश बालघटे,सौ सोनाली बालघटे,मठाधिपती रविवार महाराज, मानकरी गणपतराव राजेमाने ,शिवराज राजेमाने, दिपसिंह राजेमाने, तेनसिंग राजेमाने पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, माजी नगराध्यक्ष तुषार विरकर,कैलास भोरे, विलास माने, धनाजी माने, सुरेश माने, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन महेश बुरुंगे, व्हा. चेअरमन वैभव गुरव, हरिभाऊ गुरव, सचिव दिलीप किर्तेणे , अजित गुरव, मार्तंड गुरव, राहुल मंगरुळे, अभिजीत केसकर आदीच्या उपस्थितीत श्रीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साह मध्ये साजरा करण्यात आला यानंतर सुंटवडा वाटण्यात आला.