गुन्हा नाही, गुन्हेगार बघून आवाज उठवला जातो

32

भारतीय सत्ताधारी आणि त्यांचे भक्त यांच्या कडे न्यायीक दृष्टिकोन नाही याची प्रचिती देशाला वारंवार आलेले आहे. मग सत्तेमध्ये कोणी ही असतो. प्रत्येकाचे भक्त असतात, सत्ताधारी न्यायाच्या दृष्टीने कधी कोणत्याही अडचणी कडे बघताना दिसत नाहीत हे वास्तविक विसरून चालणार नाही. आणि अलिकडे तर सर्व सामान्य माणसाच्या बाजुने ज्याने उभे रहायला पाहिजे, विरोधी पक्षाची भुमिका घेऊन ज्यांनी सत्ताधारी व्यवस्थेला प्रश्न विचारायला पाहिजे तेच माध्यमे आज सरकारच्या बाजुने उभे राहून सरकारचे मत जनतेवर लादत आहेत. थोडक्यात प्रसार माध्यमांनी सुद्धां आपली जबाबदारी विसरून सत्ताधारी लोकांत मिसळून न्यायीक भुमिका विसरलेले दिसत आहेत. सध्या धार्मिक अंधता एवढी वाढली आहे की भक्त मेंदुचा वापर नेमका करतात कशासाठी हेच कळत नाही. आणि भक्तांना सत्यापासुन, ज्ञानापासून, तर्कापासुन दुर ठेवण्याचे काम सत्ताधारी लोकांशी एकरूप झालेले प्रसार माध्यमे नियोजन पद्धतीने करत आहेत. सध्या श्रद्धा हत्याकांड प्रकरण खूप चर्चीले जात आहे.

मी अगोदरच स्पष्ट करतो की आजही स्रियांना स्रि म्हणून जर स्वातंत्र्य दिले जात नसेल, लव जिहाद, ऑनर किंलींग, घरगुती छळ, बलात्कार, विनयभंग अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करून महिलांना संरक्षण आणि सुरक्षा मिळत नसेल तर या प्रवृत्ती चा निषेधच आहे. आणि ज्याला मेंदु आहे, माणुसकी आहे तो या सर्व गोष्टींचा निषेध करणारच यामध्ये दुमत नाहीच. परंतु देशात सध्या वातावरण एवढे दुषीत झाले आहे की एखाद्या प्रकरणाचा निषेध करायचा, आवाज उठवायचा किंवा न्याय माघायचा तर गुन्हा बघितला जात नाही गुन्हेगार बघितला जातो. आणि हीच प्रवृत्ती ठेचून काढणे आवश्यक आहे.

सध्या श्रद्धा हत्याकांड विषयी चर्चा सुरू आहे. श्रद्धा ला न्याय मिळायलाच पाहिजे यासाठी सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया, यावर वेगवेगळ्या प्रतीक्रीया तर काही काही संघटने कडून निवेदने, आंदोलन सुरू आहेत. महिलांवर अन्याय अत्याचार झाला तर महिला संरक्षण, सुरक्षा आणि न्याय यासाठी सर्वांनी एकत्र येणे हे माणुसकी व न्यायाचे लक्षण आहे ते आलेच पाहिजे. पण फक्त नाव आफताब आहे म्हणून आरडाओरडा करणाऱ्या प्रवृतींना नेमके काय म्हणावे? फक्त आफताब नावामुळे जर आरोपी विरोधात आवाज मोठा होत असेल तर हे मेंदू सक्रिय असल्याचे लक्षण नाही. श्रद्धा च्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हायलाच पाहीजे पण ते नाव बघून नाही गुन्हा बघून. शिक्षा एवढी कठोर व्हावी की पुन्हा मुलींकडे, स्रियांकडे कोणी नजर वाकडी करून बघायची हिंमत करणार नाही किंवा अन्याय अत्याचार करण्याची हिंमत होणार नाही. परंतु बिलकिस बानू बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असतात चांगल्या वागणूकीमुळे सुटका होऊन बाहेर येणाऱ्या आरोपी चे स्वागत करणाऱ्या प्रवृत्ती आफताब ला कठोर शिक्षा व्हावी या साठी कशाच्या आधारावर दण आपट करत असतील हा चिंतनाचा विषय आहे.

बिलकिस बानू प्रकरणात शिक्षा माफ केलेल्या आरोंपी विषयी एकही शब्द न बोलणारा मिडिया आफताब या नावावरून लव जिहाद वर वाद विवाद का घडवून आणत असेल? देशामध्ये दररोज महिला हत्या, बलात्कार आणि ऑनर किलींग चे प्रकरण घडत असतात. परंतु ठराविक प्रकरणे उचलून का धरले जातात? या मागे खरचं न्यायीक भुमिका आहे की मना मध्ये जातीवाद, उच्च निच्चतेची घाण आहे हे तपासून पाहणे आवश्यक आहे. अस बोलण्या मागचे कारणही तसेच आहे. पिडीत महिला जर वरच्या जातीची असेल तर तिचे नाव सुद्धां उच्चारले जात नाही परंतु पिडीता जातीय उतरंडीत खालच्या जातीमधील असेल तर तीची वंशवाळ समोर आणली जाते. याचे उदाहरण म्हणजे खैरलांजी मध्ये झालेल्या प्रकरणामध्ये भोतमांगे यांच्या मुलीचे नाव घेऊन घेऊन तिला बदनाम करण्यात आले, एवढी निर्घृण हत्या आणि बलात्कार करणारे लोक निर्दोष सुटले, तेव्हा मात्र भोतमांगे च्या न्यायासाठी कुणालाही जातीचे वगळता कुणालाही रस्त्यावर येऊन न्याय माघण्याची हिंमत झाली नाही. परंतु दिल्लीत उच्चवर्णीय भगिनी वर जेव्हा बलात्कार झाला तेव्हा मात्र तिला दामीनी नाव देऊन तिचे नाव लपवण्यात आले.

आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी महिला विविध संघटना रस्त्यावर आल्या, मेनबत्ती पेटवून न्यायाची अपेक्षा केली, मिडीया ने प्रकरण उचलून धरले आणि आरोपींना सर्वांसमोर उघडे केले आहे तात्काळ त्यांना सजा सुद्धा झाली. ही बाब न्यायीक दृष्टीने अगदी बरोबर आहे अस व्हायलाच पाहिजे. पण हिच बाब जर खैरलांजी विषयी झाली असती तर देशात अजूनही माणुसकी जिवंत आहे, न्यायासाठी जात पात धर्म नाही तर महिला बघुन लढले जाते याची प्रचिती देशाला आली असती. पण खैरलांजी आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी मिडिया आणि अंधभक्त यांची भुमिका वेगवेगळी दिसुन आली. जर महिलांविषयी सारख्या च प्रकरणात न्याय, मांडणी, आंदोलन आणि कव्हरेज जर वेगवेगळे असेल तर महिला अत्याचार कसे थांबतील?
देशात अनेक प्रकरणे असे झाले आहेत की नात्याला, माणुसकीला आणि महिला च्या अस्मिता व स्वाभीमानाला ठेच लागेल. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आंदोलन, वाद विवाद, कँडल मार्च झाले नाही याचे कारणही कळाले नाही.

दोन तिन उधारणे आपण बघु. परंतु पुन्हा एकदा लक्षात आणुन द्यावे वाटतं गुन्हेगार हा गुन्ह्याचे स्वरुप बघुन ठरवावा जात, धर्म, पक्ष, संघटन बघून गुन्हेगार ठरवु नये वा आवाज उठवू नये. इंदोर मध्ये राजेश विश्वकर्मा नामक व्यक्ती एका महिलेशी लग्न करतो, बायकोला गावाबाहेर असलेल्या फार्म हाऊसवर घेऊन जातो, दारू पिऊन तो व त्याचे मित्र गँगरेप करतात, तिला सिगारेट चे चटके दिले जातात, पॉर्न मुव्ही दाखवून तिला तसे कृत्य करायला लावतात, मित्रासमोर न्युड डांन्स करून सर्व जन भोगतात, फार्म हाऊस वर एका महिलेला कपडे घालु दिले जात नाहीत, पती सोबत मित्रही तिच्या शरिराचे लचके तोडतात, तिने जास्तच प्रतिकार केला तर सर्वजन तिला चावे घेतात, नोकर सुद्धां तिच्या सोबत गैरवर्तन करतो, दररोजच्या दारु, बलात्कार आणि न्यूड पार्टीमुळे जिवनाचे नरक झालेली आणि तब्बल दोन वर्षे या अमानुष कैदेत राहीलेली महीला स्वतः ची सुटका करून न्याय मागते. तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स मिडिया, वाद विवाद करणे तज्ञ, कँडल पेटवणाऱ्या महीला, आणि कठोर शिक्षा द्या म्हणणारे अंधभक्त कोणत्या बिळात होते? हजारो अंधभक्तांना इंदोर चे प्रकरणच माहिती नसेल. एक लाख स्वेअर फुट मध्ये बांधलेल्या फार्म हाऊस मध्ये हे अमानुष कृत्य सुरू होते.

पण या ठिकाणी कोणाला च आवाज उठवावा, महिलेला न्याय द्यावा अस वाटलं नाही. दुसरे उदाहरण घेऊ औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील. दोघांजणाचे एकमेकांवर प्रेम, दोघेही हिंदुच, परंतु जाती वेगवेगळ्या, प्रेमाला घरच्यांचा विरोध, दोघेही मंदिरात जाऊन देवाला साक्ष ठेऊन लग्न करतात. परंतु हे लग्न मान्य नसल्याने, आणि लग्नानंतर मुलगी घरी आल्यानंतर आई आणि भावाने विळ्याने तिचा गळा चिरून मुंडके डोक्या पासून वेगळे करून, हातात मुंडके घेऊन फोटो काढले जातात. तेव्हाही इलेक्ट्रॉनिक्स मिडिया वाल्यांना वादविवाद करण्याची इच्छा होत नाही. दोघेही हिंदू असून ऑनर किलींग का होते यावर कुणी चर्चा केली नाही, कँडल मार्च वाले, कठोर शिक्षा द्या म्हणणारे एकदम गायब. अस का होत असेल एवढे कृर कृत्य होऊनही न्याया साठी, पुढे असे काही होऊ नाही म्हणून चर्चेसाठी, पिडीतेला आंदरांजली वाहण्यासाठी कोणीच समोर का येत नसेल? आपण जर एक विचार केला तर प्रकरणे तेच उचलले जातात जेथे समाजामध्ये तणाव निर्माण होऊन दोन घटामध्ये संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती असते. आणि दोन गटात संघर्ष जरी होणार नसला तरी मिडिया एवढे पेटवून देते कि टीव्ही बघत असतात दोन गट स्पष्ट दाखवून देते. आणि एकमेकांना विषयी द्वेष आणि हिन भावना निर्माण होईल एवढे नाट्यमय चित्रीकरण मिडिया वाले करतात.
आता आफताब प्रकरणातच बघा ना आफताब हा शब्द समोर आला आणि भक्तांची झोप उडाली, श्रद्धा ला न्याय देण्यासाठी भक्त समोर येऊ लागले चँनल वाले विषमतेचे विष पेरण्यासाठी लव जिहाद वर चर्चा सत्र, वाद विवाद घेऊ लागले, संशोधन करून, विश्वसनीय सुत्रांकडून माहिती घेऊन घेऊन मिडिया वाल्यांनी आणि घाण राजकारण करणाऱ्यां धर्मांधांनी आफताब ला मुस्लिम बनवून टाकले. आणि लव जिहाद चा डंका पिटायला लागले.

समाजात द्वेष निर्माण कसा होईल अशा पोस्ट प्रतिक्रिया माध्यमे व सोशल मिडिया वर फिरायला लागल्या. शेवटी समजले आफताब नाव जरी मुस्लिम असले तरी आफताब हा मुस्लिम नाही आफताब पुनावाला असे त्याचे पुर्ण नाव असुन तो मुस्लिम नाही. थोडक्यात काय तर महिला संरक्षण, सुरक्षा आणि न्यायासाठी प्रत्येकाने तत्पर असायला पाहिजे. परंतु महिला अत्याचार, बलात्कार, लवजिहाद, ऑनर किलींग याचा फायदा राजकीय दृष्टीने कोणी घेऊ नये. महीलांच्या अन्याय अत्याचाराचा फायदा घेणारा व्यक्ती मनुष्य असुन शकत नाही, तसेच गुन्हा न बघता गुन्हेगार व त्याची जात बघून आवज उठवणारी व्यवस्था ही न्यायीक व पारदर्शी व्यवस्था नाही. म्हणून प्रत्येकाने धर्मांध लोकांच्या कृतीला, प्रतिक्रियेला अगोदर त्यामागचा हेतु तपासणे आवश्यक आहे. फक्त न्याय मिळावा एवढाच उदात्त हेतू असेल तर न्याया साठीच लोक आंदोलन, चर्चा वा वाद विवाद करत असतील तर न्याय तर मिळेच पण अत्याचाराचे प्रमाण ही कमी होईल पण पुन्हा एकदा, शिक्षा देताना, न्याय माघताना गुन्हा बघावा. गुन्हेगार व त्याची जात बघु नये.

✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा. आरेगाव ता. मेहकर)मो:-९१३०९७९३००