लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या मातब्बरांचे मुद्रांकावर विकासकामाचे खोटे आश्वासन

33

🔹कुर्झा प्रभाग क्र.दोन येथील घटना, जिल्हाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप सत्ताधारी गटाच्या अंगलट येण्याची शक्यता

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 20 नोव्हेंबर) :-निवडणूक काळात वाकून नमस्कार करणारे उमेदवार लोकप्रतिनिधी होताच मालक झाल्याच्या रुबाबात दिसतात. भयमुक्त, निःपक्षपाती निवडणूका होणे ही लोकशाहीची पूर्वअट आहे. तेव्हा आचारसंहितेचे पालन करणे आणि जर कोणी त्याचे उल्लंघन करत असेल तर त्यावर कारवाई होणे आपला अधिकार आहे.मात्र शहरातील कुर्झा प्रभाग दोन (विद्यानगर)भागात मागील अनेक वर्षापासून मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2019 मध्ये उमेदवारांनी विकासाचे लेखी हमीपत्र देतं विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आणी एक-दोन वर्षात संपूर्ण विकासकामे करू अन्यथा राजीनामे देणार असे शासकीय मुद्रांकावर लेखी आश्वासन उमेदवारांनी देतं नगरपरिषदची सत्ता काबीज केली.

पण विकासकामे करण्यासाठी दिलेल्या लेखी मुद्रांकाचा विसर पडलेल्या लोकप्रतिनिधिंनी मागील तीन ते चार वर्षात प्रभागात विकासकामे केले नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिक आक्रमक झाले असून या गंभीर प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांचे कडे देण्याचा इशारा दिला आहे.

ब्रह्मपुरी नगर परिषदेवर सर्वप्रथम अशोक भैय्या यांची एक हाती सत्ता पहायला मिळाली तर काही वर्ष भारतीय जनता पार्टी कडे नगर परिषदेची सूत्र सांभाळायला ब्रम्हपुरीतील मतदारांनी सत्ता दिली. सद्यस्थितीत काँग्रेस पार्टीकडे नगर परिषदेत एकहाती सत्ता आहे .2019 ला नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली या निवडणुकीत 1 नोव्हेंबर 2018 ला आचार संहिता लागू झाली. निवडणुकीमध्ये एकूण 19 नगरसेवकांना निवडून द्यायचे होते. काही उमेदवारांनी विकासकार्याच्या आधारावर मतदारांना मते मागितली तर काहींनी कायद्याचा भंग करीत वेग-वेगळी प्रलोभने देऊन मते मिळविली व विजयी होऊन नगर परिषदेत प्रतिनिधित्व करीत आहेत.

कुर्झा प्रभाग क्रमांक दोन येथील चूरशिची लढत बघता काही उमेदवारांनी चक्क आचार संहितेचा उल्लंघण करून कुर्झा (विद्यानगर)येथील मतदारांना विकास कामाचे प्रलोभन देत आम्ही आपल्या भागातील विकास कामे एक-दोन वर्षात पूर्ण करु,कामे पूर्ण न केल्यास स्वतः राजीनामा देऊ,राजीनामा न दिल्यास कायदेशीर रित्या राजीनामा मागण्याचा अधिकार मतदारांना असेल असा मसुदा लिहलेले शपथपत्र शासकीय मुद्रांकावर मतदारांना लिहून दिल्याचे समोर आले आहे. मात्र निवडून येतं पद प्रतिष्ठा मिळवलेल्या लोकप्रतिनिधिना मागील तीन ते चार वर्षात आपल्या वार्डातील विकासकामे पूर्ण करणे शक्य झाली नाहीत व नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींची भेट घेणेही कठीण होऊन बसल्याने फसवणूक करणाऱ्या या लोकप्रतिनिधींच्या वागण्याला कंटाळून विद्यानगर कुर्झा प्रभागातील नागरिकांनी वृत्तपत्र प्रतिनिधिंना माहिती देतं, आमच्या विद्यानगर वार्डात दगड निघालेले रस्ते, गटारांची सोय नाही, एक दिवस पाणीपुरवठा योजनेचे नळ न आल्यास पाण्यासाठी भटकंती, गटार नसल्याने स्वच्छतेचा अभाव,नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी फार कमी येतात.

त्यामुळे डासांचे साम्राज्य वाढले असून , जनतेच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत लोक मागील 40 वर्षांपासून या प्रभागात राहत आहेत पण परिस्थिती ग्रामपंचायत काळातीलचं असल्याने उमेदवारांकडून फसवणूक झाली असल्याची माहिती सांगितले व सदर गैर प्रकाराची जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे तक्रार देखील करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आचारसंहितेचा भंग करीत मुद्रांकावर मतदारांना प्रलोभन देऊन तसेच शपथपत्र लिहून दिलेले शब्द पूर्ण न केल्याने या शासकिय मुद्रांकाचा अवमान उमेदवारांनी केला आहे तसेच तत्कालीन वेळेत “मुद्रांकावर लेखी आश्वासनाने मतदारांना प्रलोभन” अशा आषयाचे विविध प्रसिद्ध वृत्तपत्रात बातम्या प्रसारित झाल्या असतांना सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आचारसंहिते दरम्यान खोटे आश्वासन देतं मतदारांची फसवणूक करणाऱ्या उमेदवारांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे मतदारांची फसवणूक करीत लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांची जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे तक्रार करीत त्यांची नावे लवकरच सार्वजनिक रित्या जाहीर करणार असल्याची माहिती देतं आहेत त्यामुळे आगामी काळात ब्रह्मपुरी नगर परिषदच्या राजकारणात मोठे भूकंप घडण्याची शक्यता राजकीय तज्ञाकडून वर्तवली जातं आहे.