चिमुकली चा शेताजवळील नहरात बुडून मृत्यू

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.20 नोव्हेंबर):- तालुक्यातील मौजा रानबोथली येथील-कुमारी अमृता संदीप मरस्कोल्हे वय 10 वर्ष हिचा शेताजवळील नहरात जवळपास सकाळी 11वाजताच्या सुमारास नहरात बुडून मृत्यू झाला. सदर बाब मृतक अमृता आपल्या आजीसोबत शेतावर गेली होती.

ती अचानक नहराजवळ गेली असता तीचा पाय घसरला आणि ती नहराच्या वाहत्या पाण्यात पडून जवळपास एक किलोमीटर अंतरावर जावून मृतक अवस्थेत सापडली. मृतक अमृताला आई- वडील, एक बहीण, एक लहान भाऊ असा परिवार असून अमृताच्या जाण्याने तिच्या परिवारावर व गावात शोकाकुळ पसरली आहे.