पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षाचा तुरुंगवास : डी. टी. आंबेगावे

33

🔸प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची महाड तालुका कार्यकारिणी जाहीर

✒️रायगड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

महाड,रायगड(दि.28नोव्हेंबर):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची महाड तालुका कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे व कोकण युवाध्यक्ष सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली.

महाड तालुका अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढवण, तालुका उपाध्यक्ष विशाल मोहिते, सचिव समीर पवार, खजिनदार अभिजित ढाणीपकर, संघटक राकेश देशमुख, सहसंघटक सुयोग जाधव, कार्याध्यक्ष मिलिंद पवार, सदस्य नितेश पवार, सुमेध साठे, आदेश प्रसाद, सौरभ बनकर, सचिन चांदोरकर, सतीश मेहता, निलेश शिंदे, संदेश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी पत्रकारांची आचारसंहिता व पत्रकारांच्या अंगी कोणते गुण असावेत? या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्याला, हिंसाचार करणाऱ्याला अथवा तशी चिथावणी देणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड अशी पत्रकार संरक्षण कायद्यात तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली.

तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या एकाही पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल होऊ देणार नाही. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी संघटना अहोरात्र कार्य करीत आहे त्यामुळे पत्रकारांनी नेहमी निःपक्षपातीपणे बातमी प्रसिद्ध करावी असे प्रतिपादन केले.यावेळी कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. महाड तालुका अध्यक्ष ॲड स्वप्नील ढवण यांनी आभार मानले.