बॉलीवूड मार्शल आर्ट्स एक्सपर्ट चीता यजनेश शेट्टीने सलग 14 व्या वर्षी ब्रूस लीचा साजरा केला वाढदिवस

30

✒️अनिल बेदाग(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.29नोव्हेंबर):- देश-विदेशातील लोक जगप्रसिद्ध ब्रूस ली यांचा वाढदिवस म्हणजेच २७ नोव्हेंबर मोठ्या थाटामाटात साजरा करतात.भारताच्या “चीता जीत कुन डो ग्लोबल स्पोर्ट्स फेडरेशन” (सीजेकेडी) चे अध्यक्ष आणि चित्रपटांचे प्रसिद्ध मार्शल आर्ट एक्सपर्ट चीता यजनेश शेट्टी यांनी देखील ब्रूस लीचा 82 वा वाढदिवस सलग 14 व्या वर्षी अंधेरी (पश्चिम) येथील सावन डान्स अकादमीच्या सभागृहात येथे 27 नोव्हेंबर 2022 रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी मुलांनी मिळून केक कापला. सर्व मुलांना वह्या, फराळ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यानंतर मुलांनी ‘ब्रुस ली’च्या वाढदिवसाचे बॅनर बनवून ते फुगे आकाशात सोडले. चीता यजनेश यांनी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बरे वाटल्याचे सांगून प्रत्येक तरुण व मार्शल आर्टिस्टने समाजासाठी काहीतरी करावे असे आवाहन केले.यावेळी चीता यजनेश शेट्टी, श्रावण शेट्टी, अमरजीत कौर शेट्टी आदींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

यावेळी चीता यजनेश शेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले आणि यजनेश म्हणाले, “मार्शल आर्ट्स शिस्त, समर्पण, इतरांबद्दल आदर इत्यादी प्रेरणा देतात. याद्वारे लोक आपले शरीर आणि मन निरोगी ठेवण्यात यशस्वी होऊ शकतात. ही लढण्याची कला नाही तर स्वत: संरक्षणसाठी आहे. आपण सर्वांनी ब्रूस लीचे आभार मानले पाहिजेत, ज्यांच्यामुळे मार्शल आर्टचा प्रसार आणि देश-विदेशात सर्वांना प्रेरणा मिळाली आहे.”

दरवर्षी यजनेश शेट्टी समाज, पर्यावरण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, जंगल वाचवा, कोविड सुरक्षा इत्यादी विषयांवर कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये जनहिताची भावना निर्माण करतात. चीता यजनेशने संजीव अग्रवाल, चीता सीजेकेडी दिल्लीचे अध्यक्ष सगीर हायड्रोस, उपाध्यक्ष सीमा अनेजा, झीशान गाझी खान, कुबेरन हाउस, निंजूर पिक्चर्स, कुओसमीडिया, पिकअपबिझ सॉफ्टवेअर प्रा. लि. चे सहकार्य दिल्याबद्दल धन्यवाद केल्या. तसेच गेल्या 14 वर्षांपासून चीता यजनेश शेट्टी यांना सतत पाठिंबा देणाऱ्या आणि जनजागृतीसाठी पाठिंबा देणाऱ्यासाठी मीडियाचे आभार मानले.