राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात एड्स जनजागृती

27

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.1डिसेंबर):- स्थानीक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब, शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने जागतिक एडस् दीन संप्पन झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य लेफ्टनंट डॉ. प्रफुल्ल बनसोड होतें. त्यांनी सर्व विद्यार्थ्याना शपथ दिली. उपजिल्हा रुग्णालय चिमूर रेड रीबन क्लब समपुदेशक डॉ. बांडेबुचे यांनी मार्गदर्शन केले.

सोबत कु. हलमारे उपस्थीत होते. महाविद्यालयात जागतीक एड्स जनजागृती सप्ताह चे आयोजन केले आहे. पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रा. कार्तिक पाटील, व डॉ हरेश गजभिये प्रा. पीतांबर पिसे, डॉ. रहांगडाले, डॉ. कामडी, डॉ. मेंढूलकर, प्रा. आशुतोष पोपटे व इतर सहकारी उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रफूल राजूरवाडे यांनी केले. तसेच आभार रा से यो चे डॉ. कत्रोजवार यांनी मानले. याप्रसंगी विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

https://www.purogamiekta.in/2022/11/30/56223/