“प्रोटान” शिक्षक संघटनेचे पुरस्कार जाहीर

29

🔹जिल्हा अधिवेशन व पुरस्कार वितरण ४ डिसेंबर रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे होणार

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.2डिसेंबर):-राष्ट्रीय स्तरावरील ट्रेड युनियन असलेल्या “RMBKS-प्रोटान” संघटनेचे शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.सामाजिक कार्यात सहभागी असलेले तसेच कृतिशील व उपक्रमशील शिक्षक/शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना “राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार” आणि “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत महिला शिक्षिका/ शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार” जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण दिनांक 4 डिसेंबर 2022 रविवार रोजी ‘अल्पबचत भवन’, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संघटनेच्या जिल्हा अधिवेशनामध्ये होणार आहे.

‘प्रोटान’ शिक्षक संघटनेच्या जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक मा.विकास पाटील साहेब शिक्षणाधिकारी (प्राथ.) जळगाव हे आहेत, तर पुरस्कार वितरण मा.नितीन बच्छाव साहेब शिक्षणाधिकारी (माध्य.) जळगाव यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मिलिंद भालेराव (जिल्हाध्यक्ष प्रोटान) हे आहेत. प्रमुख वक्ते मा.प्रा.डॉ.प्रकाश कांबळे (एसएनडीटी महाविद्यालय, जळगाव) आणि मा.गणेश काकडे (राज्य उपाध्यक्ष) हे आहेत, कार्यक्रमास सर्व गटशिक्षणाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मा.सुमित्र अहिरे (राज्य कार्याध्यक्ष) मा.बी.डी.सुरवाडे (विभागीय कार्याध्यक्ष), मा.महेंद्रकुमार तायडे (विभागीय उपाध्यक्ष), मा.प्रकाश इंगळे (जिल्हाध्यक्ष), मा.किशोर नरवाडे (जिल्हाध्यक्ष RMBKS), आनंद जाधव (जिल्हा प्रभारी) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मा.मुबारकशाह फकीर (जिल्हा कार्याध्यक्ष), मा.मिलिंद निकम (जिल्हा महासचिव), मा.अजय पाटील (जिल्हा सचिव), मा.सोपान भवरे, मा.यशराज निकम (जिल्हा उपाध्यक्ष), मा.रघुनाथ घोडेस्वार (कोषाध्यक्ष) यांनी पुरस्कारर्थी यादी जाहीर केली, ती पुढील प्रमाणे-

*जळगाव-* १)देविदास मुरलीधर वाघ, जय भवानी माध्यमिक विद्यालय, मेहरुण २)ब्रह्माणी काशिनाथ तायडे, कै. गिरीजाबाई दत्तूशेठ चांदसरकर माध्यमिक विद्यालय पिंप्राळा ३)संजय महादू वानखेडे, ला.ना. सार्वजनिक विद्यालय, जळगाव ४)मनिषा महारु मोरे, जि.प.प्राथ.शाळा, शिरसोली.

*भुसावळ तालुका-* ५)सुरेश सिताराम अहिरे, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय, तळवेल ६)वैशाली वसंत जंजाळे, राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे पानाचे.

*चाळीसगाव तालुका-* ७)किशोर नारायण वाणी, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, खडकी बु; ८) सतीलाल केदार दाभाडे, माध्यमिक विद्यालय, पातोंडा.

*अमळनेर तालुका-* ९)पुरुषोत्तम रतन माळी, जि प प्राथमिक शाळा, हिंगोणे खु: प्र.अ. १०)अजय भगवान भामरे, शांतिनिकेतन विद्यामंदिर, अमळनेर ११)जयश्री विजय वाडेकर, डी आर कन्या शाळा, अमळनेर.

*भडगाव तालुका-* १२)नंदू दौलत पाटील, जि प प्राथमिक शाळा, पथराड १३)सुरेश भावडू भिल, जि प प्राथमीक शाळा, पिचर्डे १४)अनुपमा एकनाथ बागुल, जि प प्राथमिक शाळा, गोंडगाव.

*रावेर तालुका-* १५)कृष्णा शामराव धंधरे, माध्यमिक विद्यालय, विवरे १६)तबरेज अखतर ख्वाॅजा मियाॅ खाॅ, जि प उर्दू मुलांची शाळा, रसलपूर.

*चोपडा तालुका-* १७)मदन कुमार भगवान भोई, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा १८)पंढरीनाथ रामचंद्र माळी, शामराव येसू महाजन विद्यालय, अडावद.

*जामनेर तालुका-* १९)भूषण सुदाम घुगे, ललवाणी माध्यमिक विद्यालय, जामनेर २०)प्रा.वर्षा रंगनाथ लोखंडे, आ.र.भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी.

*धरणगाव तालुका-* २१)प्रमोद धर्मराज पाटील, महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव २२)रामेश्वरी अरुण बडगुजर, जि प प्राथमिक शाळा, वाकटुकी.

*पाचोरा तालुका-* २३)विलास भास्कर पाटील, जि प प्राथमीक शाळा, कुऱ्हाड २४)प्रा.डाॅ. किरण आत्माराम चव्हाण, सरदार एस.के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा.

*यावल तालुका-* २५)सलीम मुराद तडवी, जि प प्राथमिक शाळा, पिंपरुळ २६)अब्दुल रहीम शेख उस्मान पिंजारी, अंजुमन इस्लाम उर्दू माध्यमिक स्कूल, साखळी २७)गजानन अशोक सुरवाडे, शारदा माध्यमिक विद्यालय, न्हावी.

*पारोळा तालुका-* २८)प्रा.डाॅ. चंद्रकांत मुरलीधर नेतकर, किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा २९)मनिषा वसंत नारखेडे, जि प प्राथमिक शाळा, खेडीढोकमुक्ताईनगर तालुका – ३०)संतोष अंबादास धनगर, जि प प्राथमिक शाळा, चारठाण.

*एरंडोल तालुका-* ३१)निलेश शिवाजी पाटील, जि प प्राथमिक शाळा, जानफळ बोदवड तालुका- ३२)महेंद्र पंढरीनाथ कोळी, गोपाळ देवबा ढाके विद्यालय, ऐनगाव ३३)विलास सूर्यभान धनगर, जि प प्राथमिक शाळा, कोल्हाडी.

https://www.purogamiekta.in/2022/12/02/56323/