स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी रिपांइं (आठवले) सज्ज – डॉ सिद्धार्थ भालेराव

50

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2डिसेंबर):-राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था लढवून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सत्ताकेंद्रात आणण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली जोमाने कामाला लागून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ भालेराव यांनी शुक्रवारी मुंबई येथील राज्य कार्यकारणी बैठकीत व्यक्त केले.
रिपाई आठवले गटाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी (दि.२) दुपारी ३ वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्याचे माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, माजी आमदार सुमंत गायकवाड, सरचिटणीस गौतम सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम व डॉ सिद्धार्थ भालेराव महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मराठवाड्याच्या वतीने मनोगत व्यक्त करताना प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ भालेराव म्हणाले की, मराठवाड्यात तसेच परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था लढवून जिंकण्यासाठी आम्ही जोमाने कामाला लागणार आहोत. आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी तरुणांना राजकारण व निवडणुकीत आगामी काळात संधी देणार असल्याचे प्रतिपादनही डॉ.भालेराव यांनी यावेळी केले.

https://www.purogamiekta.in/2022/12/02/56336/