घुग्घुस शहरातील मोकाट कुत्रे, जनावरे बंदोबस्त करा..यंग चांदा ब्रिगेडची मागणी

32

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.५ डिसेंबर ):- सोमवार रोजी घुग्घुस नगरपरिषद कार्यालयात निवेदन देण्यात आले,बरेच दिवसापूर्वी यंग चांदा ब्रिगेड व बहुजन महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी यांनी पहिले काही दिवसापूर्वी निवेदन दिले तरी नगरपरिषदेचे मुख्यधिकारीने दुर्लक्ष करण्यात आले.

आता यंग चांदा ब्रिगेड अध्यक्ष तसेच अपक्ष आ.किशोरभाऊ जोरगेवार यांचा सुचनेनुसार आज नगरपरिषद कार्यालयात निवेदन देण्यात आले.दोन दिवसा अगोदर एका चिमुकल्या मुलाला मोकाट कुत्राने ४ ते ५ जागी चावा घेतला असून येते,जाता कामावर जाणारे नागरिक भयभीत आहे. लवकरात लवकर नगरपरिषदेने मोकाट जनावरांची बंदोबस्त करण्यात नाही आले,तर यंग चांदा ब्रिगेड घुग्घुसतर्फे नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार.

यावेळी बहुजन महिला आघाडी घुग्घुस शहराध्यक्षा सौ.उषाताई आगदारी,राजु सूर्यवंशी, कामिनी देशकर, ज्योत्सना मस्के,किरण टिपले, विना गत्छाईत, भारती सौदारी, विद्या दुबे,वंदना नळे,गीता सूर्यवंशी,भुदेवी अटेला,गणपत लभाणे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा……!