नेहरू युवा केंद्र व शिवकल्याण संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.5डिसेंबर):- नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन च्या वतीने, नेहरू युवा केंद्र गडचिरोली चे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात, ठिकठिकाणी वृक्षारोपण व ग्राम स्वच्छता करून आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी युवकांना श्रमदानाच्या माध्यमातून स्वयंसेवकाचे महत्व पटवून देण्यात आले.

*काशीपूर*(ता.चामोर्शी) येथे ग्राम स्वच्छता व वृक्षारोपण करताना शिवकल्याण संस्था अध्यक्ष अनुप कोहळे, नवरगाव ग्रामपंचायत सरपंच खुशाल कुकडे, जय बजरंग युवा मंडळ काशीपूर चे अध्यक्ष राहुल दूधबळे, सदस्य अंकुश सातपुते, वेदांत कुकडे, प्रफुल कुकडे, नीकेश वासेकर, युवराज कुकडे, प्रणय कटवे, ऋषी कुकडे, किशोर कुकडे ओमकार भांडेकर, समीर इंनमवार, प्रथम भांडेकर, समीर कुकडे, आयुष पीपरे सह गावतील युवक व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

मारोडा त.* (चामोर्शी) येथे नेहरू युवा केंद्र व शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन च्या वतीने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरोडा यांच्या सहकार्याने ग्रामस्वच्छता वृक्षारोपण व प्रभात फेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य रोशन कोहळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष मोहुरले, अरविंद कटरे, खुशाल लोधे, जी.प.शाळा मुख्याध्यापक सातपुते सर शिक्षक दुर्गे सर चौधरी मॅडम कठाणे मॅडम सह मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा……!