लुनेश्वर भालेराव यांना “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

29

🔸युनोत भारताला स्थायी सदस्यत्वासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार डॉ. मार्टिन

▪️[ वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन [ डब्ल्यूसीपीए ] द्वारा दिला जाणारा मानाचा ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड – २०२२ ” देऊन सन्मानीत करण्यात आले. ]

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.8डिसेंबर):-येथील हनुमान नगर परिसरातील रहिवाशी लुनेश्वर रघुनाथ भालेराव यांनी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात राबविलेल्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम घेत, उत्कृष्ट योगदान दिले आहे. त्यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत उच्चशिक्षित बनविले आहे. अश्या सर्व कार्याची दखल घेत श्रीरामपूर येथील खा.गोविंदराव आदिक सभागृहात वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन अर्थात, जागतिक संविधान व संसद संघ यांनी दखल घेऊन लुनेश्वर रघुनाथ भालेराव यांना डब्ल्यूसीपीए चे अध्यक्ष प्रा. डॉ. ग्लेन टी मार्टिन, उपाध्यक्ष प्रा.नरसिंहा मूर्ती, खजिनदार फिलिस टर्क, दिल्ली चॅप्टरचे अध्यक्ष डॉ.राकेश छोकर, राज्य संपादक संघ अध्यक्ष प्रकाश कुलथे, डब्ल्यूसीपीए महाराष्ट्र चॅप्टर अध्यक्ष प्रा.डॉ.दत्ता विघावे आदी मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. दत्ता दिघावे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तत्पूर्वी भारतीय शास्त्रात व धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या तुळशीला जलार्पण करून उद्घाटन केले. तद्नंतर वर्ल्ड पार्लमेंट अध्यक्ष प्रा. डॉ. ग्लेन टी मार्टिन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के लोकसंख्या भारताची असूनही संयुक्त राष्ट्र संघात भारताला कायम स्वरूपी सदस्यत्व नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उभारणीत भारताचा मोठा वाटा असून भारताला या प्रकारची सापत्न वागणूक मिळणे हा एक प्रकारचा भारतावर अन्यायच आहे. शिवाय मोजक्या पाच देशांना व्हेटोचा अधिकार असल्याने इतर सदस्य देशांचा या संघटनेत समावेश असणे म्हणजे असूनही नसल्यासारखीच अवस्था असल्याचे प्रतिपादन मार्टिन यांनी केले. उपाध्यक्ष मुर्ती यांनी वर्ल्ड पार्लमेंट भारताच्या राज्यघटनेचा सर्वतोपरी आदर, सन्मान व पालन करून आपले मार्गक्रमण करील असे स्पष्ट केले. खजिनदार फिलीस टर्क यांनीही डब्ल्यूसीपीविषयी माहिती दिली. याप्रसंगी दिल्ली चॅ.अध्यक्ष डॉ. छोकर, म.रा.सं.संघ अध्यक्ष प्रकाश कुलथे यांनीही डब्ल्यूसीपीएच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय सूचना प्रा. सुलावळे यांनी तर अनुमोदन प्रा.अरुण सावंग यांनी केले. “अर्थ कॉन्स्टिट्यूशन” ह्या मुळ इंग्रजी ग्रंथाचे मराठी आवृत्ती चे प्रकाशन, व वसुधा नाईक यांच्या “शब्द फुलांची ओंजळ” पुस्तकाचे प्रकाशन तर, बॅग, पॅड, व स्लॅशचे अनावरण करण्यात आले. कोणत्याही भारतीय भाषेत या संविधान ग्रंथाचे भाषांतर करण्याचा मान मराठी भाषेला प्रथम मिळाला. डॉ. विघावे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथील प्रा.नागेश हुलावळे, डॉ.प्राची बामणे, प्रा.ॲड. तेजल वैती यांनी अनुवादन केले. याप्रसंगी डॉ. सीमा वाघेला डॉ.अलका नाईक, प्रल्हाद घोरबंड, शाहिस्ता परवीन खान, तुकाराम निमगिरे, संगीता जामगे, राहुल मघाडे, लुनेश्वर भालेराव, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषण प्रसन्नकुमार धुमाळ यांनी मराठीत व आदिनाथ जोशी यांनी इंग्रजीत सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.विघावे यांसह सचिव प्रा.अरुण सावंग, सहसचिव ऋषिकेश विघावे, खजिनदार चिंतामण भोसले, अक्षय तेलोरे, पवन लांबोळे, अकबर सय्यद, यांनी महत्त्वाचे योगदान दिले. धरणगाववासी श्री.भालेराव यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे शहर व परिसरातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार व विविध स्तरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.