पुसेगावमध्ये वाहतुकीत बदल :वाहतूक अडथळा येऊ नये म्हणून नियोजन

36

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

पुसेगाव(दि.9डिसेंबर):- ता. खटाव जिल्हा सातारा येथे श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा दि. १७ ते २७ डिसेंबर या कालावधीत भरणार आहे. महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यांतून दहा लाखांवर भाविक या कालावधीत पुसेगावात येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस दि. २२ डिसेंबर असून, या दिवशी श्री सेवागिरी महाराज यांचा वार्षिक रथोत्सव साजरा होणार आहे.पुसेगाव येथे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख व कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली.

पुसेगावातील व परिसरातील रस्त्यावरील वाहतुकीत दि. १७ ते दि. २७ डिसेंबर या कालावधीकरिता खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. प्रवेश बंद व नो पार्किंग खालीलप्रमाणे वडूज रोडवरील राजवर्धन ढाब्यापासून शिवाजी महाराज चौकाकडे जाण्याकरिता राज्य पार्किंग झोन आहे. परिवहन बसेसना वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे तसेच वडूज रोडवरील सेवागिरी विद्यालयाकडे जाण्याकरिता सर्व वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. विसापूर फाट्याकडून पुसेगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाण्याकरिता राज्य परिवहन बसेस वगळून सर्व वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. शिवराज कार्यालयाकडून गावातील छत्रपती जातील. शिवाजी महाराज चौकाकडे बसेस वगळून येणारे सर्व वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

फलटण रोडकडून प्रस्तावित एसटी स्टँडपासून शिवाजी महाराज चौकाकडे जाण्याकरिता बसेस वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकालगतच्या सर्वच रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांना नो पार्किंग झोन केलाआहे. तसेच श्री सेवागिरी मंदिरापासून दोन्ही बाजूस २०० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग आहे.

दि. २१ रोजी रात्री १२ पासून दि. २५ रोजी मध्यरात्रीपर्यंत खालीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल केला आहे. सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता नेर, राजापूर, कुळकजाईमार्ग दहिवडीकडे जातील व दहिवडी बाजूकडून येणारी वाहने कटगुण, खटाव, खातगुण, जाखणगाव मार्गे औंध फाटाकडे विसापूरमार्गे साताऱ्याकडे

वडूज भागाकडून फलटण बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न येता खटाव, जाखणगाव, औंध फाटा, नेर ललगुणमार्गे फलटणला जातील. तसेच फलटण बाजूकडून वडूज बाजूकडे जाणारी वाहने, नेर, ललगुण, आँध फाटा, जाखणगाव, खटाव मार्गाने जातील. दहिवडी ते डिस्कळ जाणारी व येणारी वाहतूक निढळ, मलवडी, राजापूरमार्गे जातील.