देशात बलात्का-यांचे स्वागत म्हणजे संविधानाची खिल्ली उडविणे – अलताफ हुसेन

29

🔸बंधुता अभियाना चा समारोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.12डिसेंबर):- मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर या शांती व न्यायासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक संघटने तर्फे देशाची एकता व अखंडता कायम राहून संपूर्ण समाजाला बंधुत्वाच्या भावनेने एकत्रित जोडावे या उदात्त उद्देशाने एमपिजे तर्फे दि. 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत राज्यस्तरीय बंधुता अभियान राबविण्यात आला.

या अभियानाचा समारोप समारंभ व अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 11 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 11 वाजता कै .अनंतराव देवसरकर सभागृह येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एमपीजे प्रदेश कार्यकारणी सदस्य अलताफ हुसेन प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.घनश्याम धरणे यवतमाळ , डॉ .विजय माने , अॅड संतोष जैन , नदीम पटेल यवतमाळ हे उपस्थित होते .

इनायत उल्ला खान जनाब , एजाज अहमद खान , युसुफ सौदागर ,सुनील चिंचोलकर , प्रा . डॉ . अनिल काळबांडे ,अ . रउफ , गाझी असर ,नजीर आतीश , एड . वसीम अहमद ,डॉ .विवेक पत्रे , शैलेश ताजवे , संतोष कलाने , अजहर खान आदी मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत समारोप क्रार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी अँड संतोष जैन यांना दै .सकाळ वृतपत्र समुहातर्फे आयडीयल ऑफ एल एस महाराष्ट्र2022 संम्मानाने तसेच डाॅ . विजय माने यांना आयडीयल 2022 भुमीपुत्र हा संन्मानाने संमानित करण्यात आल्याने त्यांचे शॉल व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

तसेच डॉ . माझी असर ( उर्दु शायरी ) , डॉ. सै . मुजाहीद हसन एमपीजे शहराध्यक्ष यांनी राष्ट्रवाद मे मुस्लीम समुदाय का योगदान या विषया मध्ये पीएचडी प्राप्त केल्या बद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .

निबंध स्पर्धे मध्ये मराठी भाषेत प्रथम क्रमांक प्रशांत ज्ञानेश्वर शिंदे, व्दितीय क्रमांक वनिता भिमराव धोंगडे
इंगजी निबंध स्पर्धेत प्रथम आफरीन फिरदौस मो निजामोद्दीन, व्दितीय नुर फातेमा गुफरान खान, तृतीय अलमास अंजुम अन्सार खान हिने तर उर्दु भाषे मध्ये प्रथम क्र. अलमास फातेमा निसारोद्दीन, व्दितीय मुनज़्ज़ा तजईन मो. आसिफोद्दीन,तृतीय फौजिया पराविन अन्सार खान यांनी तर वक्तृव स्पर्धे मध्ये प्रथम क्र. मुसकान फातेमा मो . मुबीन, दुसरा क्रमांक तमन्नासैय्यद सलीम, तिसरा क्रमांक. अश्विनी दिगंबर कदम यांनी पटकावला .

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सैं . मुजाहीद हसन आणि बाळासाहेब ओझलवार यांनी केले.

प्रास्ताविक फिरोज अन्सारी तर आभार प्रदशन हाफीज अन्सार हुसैन यांनी केले. उद्देशिकेचे वाचन यवतमाळ सचिव आयाज खान यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रसुल पटेल, प्रा. फारुक अहेमद, काझी जहीरोदीन खान ,डॉ. फारुक अबरार, मोहसिन राज, अ . जहीर , रेखा ताई गायकवाड, सर्फराज अहेमद , तसलीम अहेमद, समिर अहेमद , तौफीक राज आदींनी अथक परिश्रम घेतले.