धनज यथे जिल्हा परिषद शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा सामने उत्साहात संपन्न

82

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विषेश प्रतिनिधी)मो:-8806583158

धनज(दि.14डिसेंबर):-मुळावा केंद्रातील जि.प.शाळेचे केंद्रस्तरीय खेळ क्रीडा, सामने मागील दोन दिवसापासून जिल्हा परिषद शाळा धनजच्या प्रांगणात चालू होते.दिनांक 14 डिसेंबर रोजी समारोप करण्यात आला.मुळावा केंद्रातील मुळावा,धनज,मोहदरी, आडद,पिंपळदरी,वानेगाव, तिवरंग ,झाडगाव, सुकळीनवीन सह केंद्रातील बाकी गावातील जि.प. शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.यात लंगडी,खो-खो,कबड्डी,या सारखे मैदानी खेळ घेण्यात आले.दोन दिवसीय सामण्यात पंच म्हणून शिक्षक होते.

कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी मा.सतिश दर्शनवाड उपस्थित होते. त्यांनी मुलासोबत खेळ खेळून खेळाचे महत्त्व सरावातुन खेळत आनंद घेतला.कार्यक्रमाला उपस्थित मुळावा केंद्रातील सर्व शिक्षक व केंद्रप्रमुख गायकवाड साहेब, गावच्या सरपंच वनिता देवानंद पाचपुते ,उपसरपंच मुक्ता संजय झाटे ,शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष विष्णू चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच चरणभाऊ डोंगरे, आनाजी बोबंले तंटामुक्त आध्यक्ष,धनज ग्रामपंचायत चे सचिव किशोर सोनटक्के साहेब, सदस्य बाळु वाळके, नविद देशमुख, शिल्पा संतोष जोगदंडे, प्रतिक्षा सुभाष झाटे, सविता गजानन व्यवहारे,प्रकाश वाळके, संतोष वाळले हे शाळाव्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक डि.एन .कांबळे, देवकते सर, कवडे सर,देवसरकर सर, होडगिर सर, बोबंले मँडम, पाठक सर,गरकर सर मदतनीस राजु गायकवाड यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .तर स्वयंसेवक दुर्गेश वाळले,विरेन डोंगरे,आशिष डोगंरे यांच्या सह गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.