चिमुरात २५ डिसेंबर रोजी भारतीय स्त्रीमुक्ती दिन सोहळयाचे आयोजन

31

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमुर(दि.17डिसेंबर):-येथील सम्बोधी बौद्ध विहार व तक्षशिला बौध्द विहार यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर रोजी भारतीय स्त्रीमुक्ती दिन, मनुस्मृती दहन दिन तसेच सम्बोधी बौद्ध विहाराचा वर्धापन दिनाचे आयोजन नेहरु वार्ड चिमुर येथे केले आहे.

दुपारी १२ वाजता होणाऱ्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण कांबळे राहणार असून उद्घाटक म्हणुन सामाजिक कार्यकर्ता सतीश इंदुरकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे, शंकरपूरच्या माजी सरपंच दिक्षा भगत, मुकबधीर विद्यालय चिमुरचे मुख्याध्यापक रामदास कामडी, सामाजिक कार्यकर्ता अॅड. धनराज वंजारी, सुरेश डांगे, अमर ठवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समारोहात निकिता टेंभुरकर, शुभम भगत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप स्वप्नील राजा यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाने होणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सम्बोधी बौध्द विहार नेहरु वार्ड चिमुर व तक्षशिला बौध्द विहार कमेटीने केले आहे.