हिंगोणे बु. येथे NSS शिबिरात वैचारिक प्रबोधन…

29

🔸शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे चरित्र म्हणजेच समता — लक्ष्मणराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.20डिसेंबर):- तालुक्यातील हिंगोणे बु.या दत्तकगावात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (+२ स्तर) एककच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात दुपारच्या बौध्दिक सत्रात सामजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे ‘महापुरुषांचे विचार आणि समता’ या विषयावर वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरवात वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली. एनएसएस गीत आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेतून सुंदर वातावरण निर्माण झाले. गुलाबपुष्प आणि रुमाल देऊन अतिथींचा सत्कार करण्यात आला. लक्ष्मणराव पाटील यांनी विविध उदाहरणे व दाखल्यांच्या माध्यमातून समता म्हणजे काय याचे सखोल विश्लेषण केले. शिवराय फुले शाहू आणि आंबेडकर यांचे चरित्र म्हणजेच समता होय. आई वडिलांची सेवा करा, समाजाचे कल्याण होईल असं कर्तृत्व गाजवा, देशाचे हित ज्यात असेल असं कार्य करा आणि माणूस म्हणून जगायला शिका असा संदेश माजी विद्यार्थी लक्ष्मणराव पाटील यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.सी.साळवे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.झेड.पाटील, प्रा.यु.व्ही.पाटील, सहाय्यक महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.आर.सी.पवार, गटचर्चे च्या सत्रासाठी उपस्थित प्रा.डी.डी.पाटील, प्रा.एस.आर.पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी कैलास महाजन देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्णा ग्रुपच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुची सुतारे आणि रुचिता शिरोळे यांनी तर आभार मानतो शारदा भोई यांनी केले.