चंद्ररुद्र यज्ञ, श्री, ज्ञानेश्वरी पारायण, संगीतमय भागवत

28

🔸कथा, हरिपाठ व हरिभजनाचा अनोखा कार्यक्रम सोहळा
_________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.20डिसेंबर):-तालुक्यातील जागृत देवस्थान श्री तीर्थक्षेत्र कोंडेश्वर महादेव देवस्थान जनुना येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा १९ ते २६ डिसेंबर २०२२ या पवित्र व धार्मिक काळात भव्य धार्मिक सप्ताहाचे आयोजनाचा शुभारंभ आज करण्यात आला.

आठवडाभर चालणाऱ्या या दररोजच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी सात ते दहा व दुपारी तीन ते पाच पर्यंत चंडी यज्ञ चे आयोजन केले आहे. तर सकाळी सात ते अकरा पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. दुपारी बारा ते दोन व दुपारी तीन ते पाच पर्यंत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत हरीपाठाच्या कार्यक्रमानंतर रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत हरी भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. संपूर्ण सप्ताहभर चालणाऱ्या या धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमात संगीतमय भागवत, श्रीमद् भागवत कथा, चंडीयज्ञ, श्री ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरीभजन व विविध प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तनाचे आयोजन केले आहे. श्रीमद् भागवत कथा ह भ प रमेश महाराज दुबे दारव्हा यांच्या अमृतवाणीने आज सुरुवात झाली.

या प्रसंगी दररोज ह भ प पुंजारामजी हाके महाराज धानोरा, मारोतराव रीठे महाराज आडतकर, अशोक महाराज तळणीकर, भास्कर महाराज खडकदरीकर, प्रभू महाराज गोपनेकर रिसोड, पांडुरंग महाराज दिवटपिंपरी व रमेश महाराज दुधे दारव्हा पाळीदीकर यांच्याही कीर्तनाचे दररोज आयोजन करण्यात आले आहे.२६ डिसेंबर रोजी काल्याचे किर्तन महामंडळेश्वर स्वामी, कृष्ण चैतन्य महाराज निळकंठेश्वर संस्थान मंठा जिल्हा जालना यांचे राहणार आहे. यासोबतच समारोप निमित्त भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आठवडाभर सर्व भाविक भक्तांकरिता राहण्याची व भोजनाची व्यवस्था कोंडेश्वर महादेव देवस्थान कडून करण्यात आली आहे. महिला भगिनी करता राहण्याची व भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री तीर्थक्षेत्र कोंडेश्वर महादेव देवस्थान जमुना यांच्या अनुकंपाने व साधुसंताच्या आशीर्वादाने व परमपूज्य नरहरी बाबा नळद यांच्या प्रेरणेने जनता जनार्दनाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. होणाऱ्या या धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोंडेश्वर महादेव देवस्थानचे मठाधिपती श्री लोकेशनंद पुरी महाराज यांनी केले असल्याची माहिती प्रचारक चरण पवार तंटामुक्ती अध्यक्ष जनुना यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.