प्रा.डॉ. उत्तम शेंडे बौद्धाचार्य परिक्षेत राज्यात प्रथम

63

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 20 डिसेंबर):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यमाने बौद्धाचार्य परीक्षा 30 ऑक्टोंबर 2022 संपूर्ण देशात घेण्यात आली होती.तसेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती.

या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधून 596 श्रामनेर (विद्यार्थी )बसले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील प्रा. डॉ. उत्तम नागोराव शेंडे हे अकोला परीक्षा केंद्र येथे बसले होते.

त्यांनी महाराष्ट्रातून 200 गुणापैकी 172 गुण मिळवुन महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे .या कार्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रभर अभिनंदन होत आहे.

तसेच पुसद तालुक्यातून तुकाराम सखाराम चौरे 200 गुणापैकी 144 गुण ,भोलानाथ सखाराम कांबळे 130 गुण , प्रल्हाद यादव खडसे 123 गुण, कृष्णा नायबराव दांडेकर 121 गुण घेऊन हे पास झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

यवतमाळ पूर्वचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाअध्यक्ष भगवानजी इंगळे तर यवतमाळ जिल्हा पश्चिमचे जिल्हाअध्यक्ष रवीजी भगत यांनी तसेच इतरही समाज बांधवांनी शब्द सुमनांनी शुभेच्छा दिलेल्या आहे.

यवतमाळ जिल्ह्याचं नाव बौध्दाचार्य परीक्षेत प्रा. डॉ. उत्तम नागोराव शेंडे यांनी मोठे करून यवतमाळ जिल्ह्याचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर आणलेत सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.