ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना अभिवादन

30

🔹संत गाडगेबाबा अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करणारे थोर समाज सुधारक- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.20डिसेंबर):- येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

यावेळी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी संत गाडगेबाबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. कीर्तनकार संत आणि समाजसुधारक होते. सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग होता. गाडगेबाबा हे गोर गरीब, दीन दलित यांच्या मधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक होते.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे सिनू इसारप, साजन गोहने, बबलू सातपुते, रतन कोंडावार, असगर खान, अजय लेंडे, उषा बोबडे, प्रिया गौरकार, सारिका पराते, सुनीता डांगे, सुनंदा लिहीतकर, भारती पर्ते, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम उपस्थित होते.