बोगस पीएचडी विकण्याचा गोरखधंदा तेजीत-आयपीएस अधिकाऱ्यांनाही बोगस पीएचडीची भुरळ

35

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:;९७६८४२५७५७

मुंबई(दि.24डिसेंबर):-मध्यप्रदेशसारख्या पुढारलेल्या राज्यातून एसपी, डीआयजी, एडीजी, आयजीपी यांसारख्या मोठ्या पदांवर काम करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लावण्याचे स्वप्न होते. या स्वप्नाचा फायदा घेत बोगस पीएचडी विकणाऱ्यांनी या आयपीएस अधिकाऱ्याला चक्क बोगस पीएचडी विकली, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती लागलेली आहे.

वरुण कपूर (Varun Kapoor) हे १९९१ च्या बॅचचे सिनिअर आयपीएस ऑफिसर आहेत. मध्यप्रदेशमध्ये त्यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. हे काम करीत असताना आपल्या कार्याची दखल घेतली जावी व नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागावी, अशी त्यांची सुप्त इच्छा होती. याच संधीचा फायदा घेत बोगस पीएचडी विकणाऱ्या एजण्ट्सनी त्यांना गाठले.

दिनांक १७ जुलै २०२२ रोजी नवी दिल्ली येथील India Habitat Center येथे जाहीर कार्यक्रम झाला. तेथे कपूर यांना पीएचडी विकणाऱ्या टोळक्यांनी बोगस पीएचडी प्रदान केली. Theophany University या बोगस विद्यापीठाची ही ऑनररी पीएचडी आहे.

अशा पद्धतीने बोगस पीएचडी देण्यासाठी अभिषेक पांडे (Abhishek Pandey) हा भामटा नामांकन शुल्क (nomination fees) या गोंडस नावाखाली लाखो रुपये उकळतो व पीएचडीचे स्वप्न बाळगणाऱ्यांची फसवणूक करतो, असे ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीला आढळून आलेले आहे.

बोगस पीएचडी विकणे, हा तर झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात सध्या अंकिता थामनकर (Ankita Thamankar) ही महिला University of Macaria, South Western American University and British National University of Queen Mary या विद्यापीठांचे एजण्ट म्हणून काम बघते. या तीनही विद्यापीठांचे जगातील कोणत्याही देशांमध्ये रजिस्ट्रेशन नाही. ही सर्व विद्यापीठे संपूर्णतः बोगस आहेत.

अंकिता थामनकर हीने या विद्यापीठांच्या नावाखाली बोगस पीएचडी विकण्याचा जणू सपाटाच लावलेला आहे. या गोरखधंद्यातून तिने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची माया गोळा केलेली आहे, याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.