भीम कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मी धावणार स्पर्धा

28

🔸नागरिकांनी सहभागी व्हावे…! – सिद्धार्थ बरडे (आयोजक मी धावणार)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.25डिसेंबर):-1 जानेवारी भिमाकोरेगाव विजयी दिनाचे औचित्य या महानविरांना आदरांजली म्हणून दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता उमरखेड तालुक्यातील मरसूळ फाटा ते जयभीमनगर कुपटी पर्यंत “मी धावणार” या स्पर्धेचे आयोजन रिपब्लिकन युवा मंच उमरखेड यांनी आयोजित केला असून जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन रिपब्लिकन तालुका अध्यक्ष तथा मी धावणार स्पर्धेचे आयोजक सिद्धार्थ बरडे, सुधाकर कांबळे, ॲड. पंजाबराव नवसागरे, प्रविण बरडे, प्रा. गजानन दामोधर, सुरेश दवणे, अनिल धोंगडे, ॲड. इम्रान खान व समस्त रिपब्लिकन युवा मंच यांनी आवाहन केले.

मी धावणार स्पर्धा मध्ये खालील प्रमाणे बक्षीस जाहीर केले आहेत
“प्रथम बक्षीस” :-5000
“द्वितीय बक्षीस” :-3000 तृतीय “बक्षीस” :-2000
प्रोत्साहन पर प्रत्येकी 500 रुपये असे असून नाव नोंदणी करिता 8766706071 मोबाईल नंबर कॉल करावा. अशी विनती आयोजकांनी केली आहे.