लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे 100 ब्लॅंकेट चे वाटप

43

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25डिसेंबर):-लॉयन्स डिस्ट्रिक्ट 3234 H2 चे गव्हर्नर पुरुषोत्तम जयपुरियाजी यांच्या क्रॉस द लाइन या घोषवाक्यानुसार गंगाखेड शहरातील लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे आज गंगाखेड शहरामध्ये गरजवंताना ब्लॅंकेट चे वाटप सुरू करण्यात आले तसेच हा ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम हा पुढील शनिवार पर्यंत निरंतर चालू राहणार आहे.

जिथे गरज तिथे लॉयन्स या उपक्रमाला आज ब्लॅंकेट वाटप करुण सुरुवात करण्यात आली याप्रसंगी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे अध्यक्ष गोविंद रोडे सचिव भगत सुरवसे संचालक संजय धारे , नागेश केरकर , जगन्नाथ आंधळे, बंडु घुले, धोंडुतात्या शेटे , रवि लांडगे, प्रशांत मुंडे, रुषीकेश काबरा , प्रकाश डिकले सर , सदानंद कुलकर्णी, महेंद्र कांबळे, महेंद्र वरवडे , अभिजित चौधरी, अमोल दिवान इ उपस्थित होते.