कवी वादळकार यांच्या “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो ने रसिक आनंदी

34

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.26डिसेंबर):- नक्षञाचं देणं काव्यमंच निर्मित “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो चे द बेस थिएटर ,कर्वे नगर येथे बहारदारपणे संपन्न झाला.

यावेळी कवी वादळकार यांच्या प्रेम कवितांची अनोखी काव्यमैफल संपन्न झाली.तरुण-तरुणींच्या मनावर आधिराज्य गाजविणा-या कवितांचा धूडगूस घालणा-या प्रेम कवितांची मैफल संपन्न झाली.

हा थिएटर शो रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला होता.त्यास रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.त्याच्या पासुन तिच्या पर्यंत,तिच्या पासुन त्याच्या पर्यंत प्रेमाचे संदेश पोहचविणा-या कवितांनी भरभरुन दाद दिली.प्रेमाच्या वादळी संदेश देणा-या कवितांचा रसिकांना आनंद मिळाला.अशा प्रेम कवितांचा हा प्रयोग आगळा वेगळा आहे.प्रेमाचे विविध रंग आम्हाला अनुभवयाला मिळाल्याची भावना उपस्थित रसिकांनी प्रतिक्रिया दिल्या.नविन प्रयोग आम्हाला “प्रेमक्लिनिकच्या”माध्यमातुन अनुभवता आला याचे रसिकांनी कौतुक केले.

*वाटा जरी संपल्या,*
*तरी दिशा अजुन बाकी आहे.*
*तुझे माझे प्रेम संपले*
*तरी आठवणी अजून ताज्या आहेत.*
तरेच
*तुझा आलेला फोन*
*माझा प्राण होता.*
*कित्येक दिवस अडकलेला श्वास*
*आज माझा मोकळा झाला होता.*
आणि
*प्रिये,मी तुला हवा हवा*
*तसाच नवा नवा आहे.*
*तुला पाहीजे तसाच*
*मी अजून कोरा कोराच आहे.*
अशा अनेक प्रेमाचे विविधरंग छटा भरणा-या कवितांचा आविष्कार प्रकट झाला.

या कार्यक्रमात वादळी कवितांचे वादळी सादरीकरण नक्षञाधीश कवी वादळकार,पुणे यांनी केले.तसेच पार्श्वसंगीत ध्वनी अमोल देशपांडे यांनी दिले.कविता थिएटर आणुन तिला प्रतिष्ठा मिळावी यासाठी या शो चे आयोजन केल्याची माहिती प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी दिली