भाजपातर्फे एमपीएससी उत्तीर्ण निरंजना भोयर यांचा सत्कार

102

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.26डिसेंबर):-भाजपातर्फे निरंजना भोयर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे सरांची विद्यार्थीनी असलेली निरंजना भोयर हि एमपीएससीमध्ये उत्तीर्ण झाली आहे.

त्याअनुषंगाने भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरंजना भोयर यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपाचे अमोल थेरे, सिनू इसारप, श्रीकांत सावे,विवेक तिवारी, मानस सिंग, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी,रज्जाक शेख, कोमल ठाकरे, व त्यांचे पती मंगेश भोयर उपस्थित होते.