कर निरीक्षक शशिकांत पाटील (सोनवदकर) यांचा सत्कार…

29

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

मुंबई(दि.31डिसेंबर):-एयर इंडिया बिल्डिंग मधील आंतरराष्ट्रीय कराधन (आयकर विभागात) वरीष्ठ कर सहाय्यक पदावर कार्यरत असलेले तसेच लवकरच ज्यांची कर निरीक्षक (Income tax inspector) पदावर पदोन्नती होणार आहे असे शशिकांत पाटील (सोनवदकर) यांचा गुलाबपुष्प देऊन लक्ष्मणराव पाटलांनी सत्कार केला.

अतिशय संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून १२ वी नंतर डीएड पूर्ण केलं. डीएड सीईटी मध्ये फक्त एक गुण कमी मिळाल्याने प्राथमिक शिक्षक बनण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. त्यानंतर अनेकदा कमी अधिक फरकाने यशाने हुलकावणी दिल्यानंतर देखील न डगमगता वाटचाल सुरू ठेवली आणि अखेरीस २०१५ मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये SSC च्या माध्यमातून नोकरीची संधी मिळाली. गणित आणि सांख्यिकी शास्त्रांत पारंगत असलेल्या शशिकांत ने काही कालावधीतच आपल्या कामाची छाप उमटवली. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्यपूर्ण सर्वंकष प्रयत्न सुरूच ठेवले. या दरम्यान डिपार्टमेंटल Exam ची संधी चालून आली. संपूर्ण भारतातून एकूण २९०४ उमेदवारांनी ही परीक्षा दिली त्यापैकी ७९० उमेदवार पात्र (पास) झालेत.

या परीक्षेचा निकाल (२७.२०%) एवढा लागला त्यात शशिकांत पाटील यांची कर निरीक्षक म्हणून पदोन्नती चा मार्ग मोकळा झाला. स्वप्ननगरी मुंबईत मरीन ड्राईव्ह भागात एयर इंडिया च्या बिल्डिंग च्या बाहेर शशिकांत पाटील (सोनवदकर) यांचा त्यांचा महाविद्यालयीन जीवनातील मित्र लक्ष्मणराव पाटील यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्यात.