भिम टायगर सेना यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

53

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.31डिसेंबर):-भिम टायगर सेना पुसदच्या वतीने शहरात १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले आहे.५०० शुरविराना बुध्द भिम गितातुन मानवंदना देवुन अभिवादन करण्यात येईल.

दि. १ जानेवारी २०२३ रोजी पुसद येथील तिन पुतळयाजवळ सुजाता महिला मंडळ ईटावा वार्ड,यशोधरा महिला मंडळ तथागतनगर पुसद यांच्या हस्ते पंचशील त्रिशरण घेण्यात येईल.व.तिथूनच भव्य मानवंदना रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक,सुभाष चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप होईल

त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम टी.व्ही.व कॅसेट फिल्म गायिका सुषमा देवी व संच मुंबई, विकाशराजा गायकवाड व संच नांदेड, धम्मदीक्षा वाहुळे लातुरकर, यांच्या शांती आणि क्रांतीवर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न होईल.
या कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी केले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रज्ञापर्वाचे माजी अध्यक्ष डॉ.राजेश वाढवे व उद्घाटक म्हणून डॉ. प्राचार्य प्रशांत वासनिक,मार्गदर्शक म्हणून भिम टायगर सेना विदर्भ अध्यक्ष विनोददादा फुलमाळी व विदर्भ नेते भिम टायगर सेना पंजाब दादा कांबळे उपस्थित राहतील .

प्रमुख उपस्थिती म्हणून इंद्रनीलजी नाईक आमदार विधानसभा, निलयजी नाईक विधान परिषद आमदार,डॉ. मोहम्मद नदीम साहेब माजी गट नेते न.प.पुसद हे उपस्थित राहतील.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ययातीभाऊ नाईक माजी जि.प.उपाध्यक्ष हे उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.महेश हंबर्डे व प्रा.डॉ. सुनील खाडे हे राहतील.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कपिल वासनिक अभियंता विज.वि.कंपनी , शिवाजीराव गवई सहा गटविकास अधिकारी, प्रविणकुमार वानखडे गटविकास अधिकारी उमरखेड, नानासाहेब भवरे सामाजिक कार्यकर्ता, महेश भाऊ खडसे अध्यक्ष लोकहित विद्यालय , भोलानाथ कांबळे माजी जि. प. सदस्य, प्रा.गोपाळ शेळकीकर ,डॉ. शिवाजीराव भुरके ,डॉ. राहुल भगत,सुधीरभाऊ देशमुख कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महा.प्रदेश, मारोती भस्मे बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष,दिलीप खैरे सामाजिक कार्यकर्ता, गजानन जाधव माणुसकीची भिंत , किशोर मुजमुले सामाजिक कार्यकर्ता, आत्माराम धाबे आदिवासी प्रकल्प अधिकारी पुसद, प्रकाश झळके उपविभागीय अभियंता सा.बा.पुसद, बंटी कावळे जिल्हा उपाध्यक्ष भिम टायगर सेना, शशांक भरणे, प्रवीण राजहंस सुप्रसिद्ध गायक,प्रा.सुधीर गोटे,संदिप कावळे,विश्वास भवरे ,शितलकुमार वानखेडे, पांडुरंग व्यवहारे विदर्भ अध्यक्ष बिरसा ब्रिगेड,ल.पु.कांबळे,सुखदेव भगत,अश्विनीताई पुनवटकर,दसरथ गुढे,राजेंद्र वाघमारे,निशांत बयास माजी नगरसेवक,उमाकांत पापिनवार , प्रा.विलास भवरे,लक्ष्मण कांबळे रिपाई आठवले गट शहराध्यक्ष, मारोतराव कांबळे ,साकिब शाहा माजी नगरसेवक,विनोद भाऊ शेंडे विदर्भ अध्यक्ष कामगार सेना,रावण शेंडे जिल्हा प्रमुख,विजुभाऊ धुळे युवा जिल्हा अध्यक्ष ,बाबाराव उबाळे,शाम मेक्षाम उपजिल्हाप्रमुख,सिमाताई आसोले,नागसेन मनवर तालुका अध्यक्ष दारव्हा,उंर्देसर,विशाल भगत, कुमार राऊत विदर्भ प्रशिध्दी प्रमुख, शाम बनसोड जिल्हा अध्यक्ष कामगार सेना,अक्षय उईके संपर्क प्रमुख दारव्हा,सिध्दार्थ दिवेकर शहराध्यक्ष उमरखेड,अशोक चव्हाण सरपंच चिखली कॅम्प,विलास खंदारे, बाळासाहेब कांबळे,गजानन हिंगमिरे, ॲड अरिफ अहेमद कायदेशीर सल्लागार, ॲड अर्जुन राठोड,संजय कांबळे गटशिक्षणाधिकारी पं. समिती देवेंद्र खडसे माजी पं. स. सदस्य ,नारायण ढोके शासकीय ठेकेदार, भारत कांबळे भारतीय बौध्द महासभा ,मिलिंद हाट्टेकर नागेश कॉम्पुटर,गोपाल जगताप, प्रा.खोष झोडगे, उपस्थित राहतील.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिम टायगर सेना, भिम टायगर सेना महिला आघाडी, भिम टायगर सेना ऑटो अंबुलन्स,प्रयत्न करीत आहेत. विनित म्हणून भिम टायगर सेना महिला आघाडी प्रमुख गिताताई कांबळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जनार्धन गजभिये,प्रा.कवी गायक प्रविण राजहंस, आंबादास वानखेडे हे करतील. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.