पुसद येथे भिमा कोरेगाव ५००शूरवीरांना बुध्द भीम गिताद्वारे मानवंदना

49

🔸भिम टायगर सेना यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम संपन्न

✒️पुसद प्रतिनिधी(बाळासाहेब ढोले)

पुसद(दि.2जानेवारी):-भिम टायगर सेना शाखा पुसदच्या वतीने शहरात भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे १जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते . ५०० शुरविराना बुध्द भिम गितातुन मानवंदना देवुन अभिवादन करण्यात आले.

दि. १ जानेवारी २०२३ रोजी पुसद येथील तिन पुतळयाजवळ सुजाता महिला मंडळ ईटावा वार्ड,यशोधरा महिला मंडळ तथागतनगर पुसद यांच्या हस्ते पंचशील त्रिशरण घेण्यात आले.व.तिथूनच भव्य मानवंदना रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक,सुभाष चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाला

त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम टी.व्ही.व कॅसेट फिल्म गायिका सुषमा देवी व संच मुंबई, विकाशराजा गायकवाड व संच नांदेड, धम्मदीक्षा वाहुळे लातुरकर, यांच्या शांती आणि क्रांतीवर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी केले होते.

या कार्यक्रमास आमदार इंद्रनिल नाईक, माजी जि.प.उपाध्यक्ष ययातीभाऊ नाईक, उद्घाटक म्हणून डॉ. प्राचार्य प्रशांत वासनिक,मार्गदर्शक म्हणून भिम टायगर सेना विदर्भ अध्यक्ष विनोददादा फुलमाळी व विदर्भ नेते भिम टायगर सेना पंजाबदादा कांबळे उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरदादा कांबळे जिल्हाध्यक्ष यांनी केले.विनोददादा फुलमाळी भिम टायगर सेना विदर्भ अध्यक्ष व पंजाबदादा कांबळे विदर्भ नेते भिम टायगर सेना यांनी मार्गदर्शन केले .तसेच यावेळी माणुसकीची भिंत पुसद व भिम टायगर सेना आँटो अंबुलन्स च्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.महेश हंबर्डे व प्रा.डॉ. सुनील खाडे हे होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भोलानाथ कांबळे माजी जि. प. सदस्य,सुधीरभाऊ देशमुख कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महा.प्रदेश, मारोती भस्मे बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष, शितलकुमार वानखेडे, पांडुरंग व्यवहारे विदर्भ अध्यक्ष बिरसा ब्रिगेड,ल.पु. कांबळे,लक्ष्मण कांबळे रिपाई आठवले गट शहराध्यक्ष, मारोतराव कांबळे ,विनोद भाऊ शेंडे विदर्भ अध्यक्ष कामगार सेना,रावण शेंडे जिल्हा प्रमुख,विजुभाऊ धुळे युवा जिल्हा अध्यक्ष ,बाबाराव उबाळे,शाम मेक्षाम उपजिल्हाप्रमुख,सिमाताई आसोले,नागसेन मनवर तालुका अध्यक्ष दारव्हा,उंर्देसर,विशाल भगत, कुमार राऊत विदर्भ प्रशिध्दी प्रमुख, शाम बनसोड जिल्हा अध्यक्ष कामगार सेना,अक्षय उईके संपर्क प्रमुख द बाळासाहेब कांबळे, देवेंद्र खडसे माजी पं. स. सदस्य ,नारायण ढोके शासकीय ठेकेदार, प्रा.खोष झोडगे,सुरेश कांबळे उपस्थित राहतील.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिम टायगर सेना, भिम टायगर सेना महिला आघाडी, भिम टायगर सेना ऑटो अंबुलन्स यांनी अथक परिश्रम घेतले.विनित म्हणून भिम टायगर सेना महिला आघाडी प्रमुख गिताताई कांबळेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जनार्धन गजभिये,प्रा.कवी गायक प्रविण राजहंस, आंबादास वानखेडे यांनी केले.तर आभार किशोरदादा कांबळे यांनी मानले.