गौतम नगर वासियाच्या वतीने गंगाखेडमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2जानेवारी):-भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमाचे गंगाखेड येथे आयोजन करण्यात आले होते.शौर्य दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखन अण्णा साळवे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये व्याख्याते सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक कवी चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.शौर्यदिन कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले याप्रसंगी व्याख्याते,कवी चंदनशिवे बोलताना म्हणाले की, संपूर्ण देशभरात मनूवादी विचाराची अमलबजावणी होत असून संपूर्ण देश खाजगीकणाकडे वळला आहे. देशभरातील महा उद्योग रेल्वे यालाही खाजगीकरणाचे स्वरूप दिले आहे,आउट सोर्सिंग मधून नोकर भरती केली जात आहे.

त्यामुळे सर्व बहुजन बांधवांनी जागृत राहून भारतीय संविधानासाठी जगायला शिकलं पाहिजे.आपण जर जागृत नाही राहिलो तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन निमित्त एक प्रकारचा संकल्प करत संविधानांसाठी जागृत राहिले पाहिजे.असे व्याख्याते चंदनशिवे यांनी आपले विचार व्यक्त केले.शौर्य दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ साळवे यांनी केले अध्यक्षीय समारोप लखन साळवे यांनी केला.यावेळी गंगाखेड वकील संघाच्या वतीने चंदनशिवे,यांचा सत्कार करण्यात आला.शौर्य दिन कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे सर्व नागरिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.