डॉ.निरजभाऊ वाघमारे यांनी समाजाचे हित जोपासण्याकरीता स्वखर्चाने भिमा कोरेगाव शौर्यदिनाचे औचित्य साधुन शववाहीनी स्मृतीरथ रूग्णवाहीका समाज हितासाठी धम्मदान

40

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
यवतमाळ(दि.2जानेवारी):- येथील नवनवे आत्मभान घेवुन सतत समाजाभिमुख राहणारे डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या स्वखर्चातून दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या औचीत्याने शववाहीनी ( स्मृतीरथ) व रुग्णवाहिका या दोन्हीं सेवांचे लोकार्पण सोहळा करण्यात आला आहे आणी अचानक व अकस्मात उद्भवलेल्या आजारावेळी रुग्णाला रुग्णसेवा मिळावी म्हणून रुग्ण जलद गतीने रुग्णालयात पोहोचावी.

या हेतुने तसेच अंत थांब्यावर मयतास घरपोच पोहोचविण्यासाठी मृतकाच्या नातेवाईकांना साह्यभूत ठरणारी शववाहिनीची सेवा या दोन्हीं सेवांचे काल सायंकाळी डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा करण्यात आले..जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी..! आपल्या हक्काचा माणूस.. डॉ. निरजभाऊ वाघमारे.