निशांत सतीश बयास अध्यक्ष,स्व.विश्वनाथसिंह बयास पतसंस्था पुसदच्या वतीने वसंतनगर पोहरादेवी येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप

28

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2जानेवारी):-श्री.निशांत सतीश बयास अध्यक्ष स्व.विश्वनाथसिंह बयास पतसंस्था पुसद यांच्याकडून डॉ. सुरेश जाधव यांनी सूचित केल्याप्रमाणे स्व.वसंतराव नाईक मूकबधिर निवासी विद्यालय (वसंतनगर)पोहरादेवी ता.मानोरा,जी.वाशिम येशील विद्यार्थ्यांना थंडीच्या दिवसात होणारी अडचण काही प्रमाणात दूर व्हावी या हेतूने सदर पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.निशांत बयास यांच्याकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.नेहमी सांस्कृतिक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली पतसंस्था अश्या प्रकारचे विविध उपक्रम राबवित असते.

आज दिनांक ०२/०१/२०२३ रोजी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी बांधकाम सभापती न.प.पुसद श्री.मनीषभाऊ शाह होते तर प्रमुख पाहुणे प्रा.श्री. वसंत सर पुसद,प्रा.श्री.बाबूसिंग राठोड सर,श्री.अनिलभाऊ नाईक,श्री.मुकींदाभाऊ आडे,श्री.संजयभाऊ राठोड,डॉ. सुरेश जाधव उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे संचलन श्री.संदीप ठेंगे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.वासुदेव राठोड सर यांनी सर्वांचे आभार मानले.तसेच सदर कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.