मुक्तांगण क्रीडा महोत्सव उत्सवात संपन्न

68

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.2जानेवारी):-येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात दरवर्षाप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा दोन दिवसीय शालेय मुक्तांगण क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. संतोष पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील हेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केलं. आलेल्या मान्यवरांचे शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा हेमलालशेठ भाटिया ,सचिव प्रा. रमेश महाजन यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी संस्थेचे पदाधिकारी घनश्यामसिह बयस, रघुनाथ चौधरी, शोभाताई चौधरी, शांताराम महाजन,ललित उपासनी व आदी संचालक यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला.व दोघ विभागाच्या मुख्याध्यापक यांचे क्रीडाशिक्षक एस एल सूर्यवंशी व कैलास माळी यांनी स्वागत सत्कार केला. महोत्सवाचे उद्घाटन मा पवार साहेब यांनी रस्सीखेच या स्पर्धेने केले. याप्रसंगी पवार साहेब यांनी विद्यार्थ्यांकडून शपथ वदवून घेतली.

व मार्गदर्शन केले. या क्रीडा महोत्सवांमध्ये शाळेतील एकूण 1800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये हॉलीबॉल, खो-खो ,रस्सीखेच, दोरी उड्या ,बुद्धिबळ ,उलटे चालणे, अडथळा शर्यत व डॉजबॉल ,50 मि.लंगडी घेऊन धावणे ,बेडूक उड्या,शेटल रन,धावणे आदी खेळांचा समावेश होता. खेळाच्या पहिल्या सत्रातले बक्षीस वितरण धरणगाव येथील नायब तहसीलदार लक्ष्मणजी सातपुते व पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील,मिलिंद सोनार तसेच दुसऱ्या दिवशीच्या सत्रात धरणगाव तहसील कार्यालयाचे गोडाऊनचे मॅनेजर मा. ज्ञानेश्वर राजपूत ,प्राथमिक शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ मनीषा पानपाटील ,दत्तात्रय पानपाटील ,पालक शिक्षक संघाचे सहसचिव समाधान मोरे व तलाठी भागवत पवार तसेच संस्थेचे पदाधिकारी तसेच दोघही विभागाचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या आलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने दोघ मुख्याध्यापक यांनी यथोचित स्वागत केले.

सकाळ सत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक एस.एल. सूर्यवंशी यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक कैलास माळी यांनी केले.आभार वर्षा पाटील व श्रीमती आर.पी.पवार यांनी मानले.शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी नेमून दिलेल्या स्पर्धेत पंच म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. महोत्सव यशस्वीतेसाठी दोघ क्रीडाशिक्षक तसेच क्रीडासमितीतील एस वाय पारखे, डी एन चौधरी, आर डी महाजन,एम एस परदेशी, सागर पाटील,वाय डी चिंचोरे, व्ही एल मोरे, वर्षा पाटील,स्वाती भावे व नीता महाजन यांनी परिश्रम घेतले.महोत्सव अतिशय आनंदात संपन्न झाला.