अभयारण्यालगतच्या गावाकऱ्यांचे धरमखिंड येथे सफारी पर्यटन गेट सुरु करण्याची मागणी

29

✒️कुही(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कुही – उमरेड पवणी कऱ्हांडला अभयारण्यात कुही वन्यजीव वनपरीक्षेत्रातील धरमखिंड हे स्थळ नयनरम्य असून दोन्ही पहाडीच्या मधोमध असलेले पर्यटन गेट हे अतिशय मनोहारी दिसणार आहे.

धरमखिंड या ठिकाणी सम्राट अशोक महाबोद्ध विहार, महानुभाव पंथ आश्रम, 1 किमी अंतरावर महादेव गड मंदिर असल्याने स्थानिक पर्यटनास मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.

तसेच धरमखिंड स्थळापासून वाघ, बिबट्याचे अस्तित्व असलेले सतिघाट तलाव परिसर, गंगासागर तलाव, रानबोडी तलाव, गोंडीनचा आखर, बुट्टीटोला तलाव, बारोबा तलाव व मुंडा तलाव आणि रानबोडी पुनर्वसनात संपादित केलेल्या 150 ते 200 हेक्टर शेतजमिनीवरील गवत कुरन परिसर असल्याने तिथे खूप मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याने पर्यटनास मोठा वाव मिळेल.

त्यासोबतच वानोडा, देणी, तारणा, विरखंडी, हरदोली डोंगरमौदा, चिकना, धामना या गावातील बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील तसेच धरमखिंड येथे सफारी पर्यटन गेट सुरु झाल्यास स्थानिक गावाकऱ्यांकडून वनविभागास मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहकार्य मिळेल.

याकरिता मौजा डोंगरमौदा, हरदोली (राजा), चिकना, तारणा व विरखंडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयातर्फे ग्रामसभेचा ठराव मंजूर केलेल्या असून गावातील नागरिक व बेरोजगार युवकानी तसे निवेदन मा. आमदार राजूभाऊ पारवे तसेच माजी आमदार श्री सुधीरभाऊ पारवे तसेच नागपूर जिल्हा प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना संदीपभाऊ इटकेलवार यांना देण्यात आलेले असून मान्यवरांतर्फे याबाबत वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांचेशी चर्चा करून पर्यटन गेट सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करून पर्यटन गेट सुरु करण्याचे आश्वसन दिलेले आहे

निवेदन देतेवेळी मनोहरजी लोखंडे, नारायणजी डहाके, परमेश्वर पडोळे, दिनेश पडोळे, सुनील माकडे, गजानन डहाके, सागर पडोळे, विक्रम रेवतकर, आकाश वासनिक, दिनेश भाकरे, महेश पडोळे, समीर रेवतकर तसेच इत्यादी गावकरी उपस्थित हॊते.