आमदार साहेब, रस्त्यांसाठी सुद्धा मोर्चा काढा!

35

जळगाव मधे दस्तुरखुद्द आमदार सुरेश भोळेंनी मोर्चा काढला.अजितदादा चे बैनर घेऊन महिला घेऊन आमदारांनी संताप व्यक्त केला.मामा,हे तुमचे काम आहे का? यासाठी २००रूपये रोजंदारीने बाया माणसे उपलब्ध असताना तुम्ही आमदार,विधायक,कायदेमंडळाचा सदस्य ज्याकामी आम्ही जळगाव च्या लोकांनी निवडून दिले ,ते काम न करता दुसरेच काम करीत आहात. आमदाराचे कर्तव्य करण्यासाठी सरकार म्हणजे आम्ही करदाते तुम्हाला दहा हजार रूपये रोजाने देतो आणि खर्च करतो.तो पैसा तुम्ही फजूल घालवला.ज्या दिवशी तुम्ही आमदाराचे काम सोडून फालतू काम केले,त्या दिवसाचे मानधन आणि खर्च सरकार जमा केला पाहिजे.तुमच्या दुकानातील नोकर कामावर आला नाही तर तो दिवस बिनपगारी करतात.

तसैच.म्हणून तुमचा एक दिवस बिनपगारी झालाच पाहिजे. आमदाराचे कर्तव्य सोडून राजनैतिक शिष्टाचार मोडीत काढला आहे.तुम्ही पार्लमेंटरी सिस्टीम चे सदस्य असतांना असे गल्ली बोळातील माणसांसारखे केले.तुम्हाला नाही काही वाटले.पण आम्ही जनतेला तर वाईट वाटले.कि आमचा आमदार रस्ते न बनवता ही नको ती कामे करतील ,अशी अपेक्षा नव्हती.जनतेची अपेक्षा फोल ठरली.आमदार फेल ठरले.आमदार साहेब,असा एखादा मोर्चा जळगाव शहरातील रस्त्यांसाठी काढा.आम्हाला बोलवा.आम्ही घोषणा देऊ.”कामचुकार आमदाराचा निषेध असो !”

आमदार भोळे साहेब, तुम्ही आमदाराचे कर्तव्य सोडून राजनैतिक शिष्टाचार मोडीत काढला आहे.तुम्ही पार्लमेंटरी सिस्टीम चे सदस्य असतांना असे गल्ली बोळातील माणसांसारखे वर्तन केले आहे.तुम्हाला नाही काही वाटले.पण आम्ही जनतेला तर वाईट वाटले.कि आमचा आमदार रस्ते न बनवता ही नको ती कामे करतील ,अशी अपेक्षा नव्हती.जनतेची अपेक्षा फोल ठरली.आमदार फेल ठरले.
अजितदादा पवार छत्रपती संभाजीराजें विषयी इतिहास सांगू लागले.ते सुद्धा चुकलेच.बारामतीच्या मतदारांनी इतिहास सांगण्यासाठी दादांना निवडून दिले नाही.जरी तसे नसले तरी दादा इतिहासाचे प्रोफेसर,लेखक, संशोधक नाहीत.तरीही उपद्व्याप करून ही चुकीची कामे केलीत.मला शंका येते, इतिहास मुद्दाम चुकीचा सांगून लोकांची भडकवणे ,हाच उद्देश तर नाही? राजकीय, वैधानिक अपयश लपविण्यासाठी हे आमदार,मंत्री असा उपद्व्याप करतात,अशी खात्री होत आहेत.

आमचे जळगाव चे आमदार श्रीमान सुरेश दामू भोळे यांचाही इतिहास वर इतका गाढा अभ्यास असावा का? कि त्यांनी अजितदादांची चूक झाली,असे ठासून सांगावे?तरीही अजितदादा ऐकून घेत नसतील तर बैनरवर फोटो लावून मोर्चा काढावा? त्यापेक्षा भोळेंनी इतिहासाचा एखादा ग्रंथ घेऊन बारामतीला जावे.अजितदादांना समोर बसून सांगावे ,कि,दादा तुम्ही चुकीचे बोलले.तुमचा अभ्यास कच्चा आहे.हा ग्रंथ वाचा.आपली चुक दुरुस्त करा.किंवा ,अजितदादांना माझी विनंती आहे कि, तुम्ही चार दिवस जळगाव ला येऊन आमदार सुरेश भोळेंकडे इतिहास विषयाची शिकवणी लावून घ्यावी.या जळगाव ला. आम्ही तशी व्यवस्था करतो.आमदार भोळेंना विनंती करतो,हातापाया पडतो,सांगतो कि, आमदार साहेब, मेहरबानी करा,अजितदादांच्या ज्ञानात भर घाला.जेणेकरून ते पुन्हा असे काही अंदाजाने बोलणार नाहीत.

लोकांच्या, किमान भाजपच्या विद्वानांच्या भावनांना ठेच पोहचवणार नाहीत.शांतता टिकून राहिल.भाजप आणि राष्ट्रवादी चे सख्य, सामंजस्य,भाईचारा,एकचारा,एकव्रत, प्रेमभाव, आदरभाव टिकून राहिल.याचे श्रेय नक्कीच आमदार भोळेंना देऊ.जर पुढे यदाकदाचित,खुदा न खास्ता भाजप आणि राष्ट्रवादी ची युती झाली तर सकाळी सात वाजता होणाऱ्या शपथविधीत आमदार भोळेंचा ही मंत्री पदाची शपथविधी उरकून घेता येईल.

मला वाटते, अजितदादा जर जळगाव ला चार दिवस आलेत तर किमान त्यांच्या पदस्पर्शाने जळगाव ची भुमी पावन होईल.दिवसभर आमदार भोळेंसमोर बसून इतिहास शिका.आपल्या ज्ञानात भर पडेल.जर गृहपाठ घेऊन कंटाळा आला, थकलेत तर संध्याकाळच्या पाहुणचाराची उत्तम सोय करू.या,दादा या.दुकान सुद्धा आपलेच आहे.काय हॉटेल !काय दुकान!काय ब्रॅण्ड!एकदम ओके !

 

टिप..सोबत चंद्रकांत दादांनाही घेऊन या.त्यांचाही इतिहास कच्चा आहे.त्यांच्या बोलण्यानेही आजकाल खूप वाद होत आहेत.अजितदादा व चंद्रकांतदादा यांच्या ट्युशन फी,लॉजींग,बोर्डींग चा खर्च सरकारने नाही केला तर आम्ही वर्गणी जमा करून पुरवू.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव