नागभीड येथे बॅंड पथकाच्या सहाय्याने पोलीस वर्धापण दिवस साजरा

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड (दि. 4 जानेवारी): – महाराष्ट्र पोलीस वर्धापण दिनानिमीॅत्य पोलीस स्टेशन नागभीड यांच्या विध्यमाने वाहतुक,रस्ता सुरक्षा रॅलीचे विशाल जनजागरण करण्यात आले, पोलीस निरिक्षक राजुभाऊ मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मविर विद्यालय येथील शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी विराट रॅलीत सहभाग होऊन नागभीड शहरातील मुख्य मार्गावर सुरक्षा वाहतुकीचे नियम,गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा,अशा प्रकारचे नारे देत विद्यार्थ्यांनि सुरक्षा सप्ताहाची रॅली काढली.

यावेळी पोलीस निरिक्षक राजु मेंढे, वैभव कोरवते, उपनिरिक्षक साखरे , बारसागडे,सुधाकर माकोडे कर्मवीर विद्यालय चे प्राचार्य देविदास चिलबुले, सर्वश्री प्रा, देवानंद प्रधान, विलास गजभे, संजय दुपारे ,शिरीष कामडी , लोमेश दुधे,सचिन मलवे ,रवी बोरकर,कु,सोनू रेवतकर,कु, सोनाली घोल्लर,रॅलीत जवळपास 300 विद्यार्थीच्या सहभागातुन , बँड पथकाच्या सहाय्याने वाजत गाजत नागभीड शहरातील मुख्यमार्गाहून परत पोलीस स्टेशन आली शालेय विद्यार्थीना मिठाई देवून मुलांचे कौतुक करण्यात येवून रॅलीची सांगता झाली.