किशोरवयीन मुला-मुलींच्या मोबाईल बंदीच्या निर्णयानंतर बांशी ग्रामपंचायतीचा आणखी एक अनोखा उपक्रम

65

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.5जानेवारी):- किशोरवयीन मुला- मुलीना मोबाईल बंदीचा ठराव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिकास आलेली पुसद तालुक्यातील बांशी ग्रामपंचायती ने आणखी एक ठराव मंजूर केला. वय १० ते १८ वर्षापर्यंतच्या मुला- मुलींना मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देणे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दि ४ जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय बान्सी येेथे बालसभा घेण्यात आली .

या बाल सभेमध्ये पुढील निर्णय घेण्यात आली वर्ग ५ ते १०वीच्या विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षण व बौद्धिक प्रशिक्षण देणे (प्रत्येकी वर्गातील ५ विद्यार्थी )वय १६ ते १८वर्षे पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देणे (फक्त २० विद्यार्थी) नियमित सराव चाचणी घेणे, नियमित शारीरिक प्रशिक्षण देणे ,प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर घेणे.

या बालसभेमध्ये सरपंच गजानन नामदेव टाले , जि.प.मराठी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत देशमुख व तसेच ज.शि.प्र.मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक पि.डि. ढाकरे या सर्व मान्यवरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले बालसभेच्या अध्यक्षस्थानी अंकुश मा़णिक पत्रे हा विद्यार्थी होता

या बालसभेला ग्रामपंचायतचे सचिव पि.आर.आडे , संतोष आगलावे, माधव डोंगरे,जुगलकिशोर शर्मा, निरंजन राठोड, ग्रा.पं .चे सदस्य, जि.प.मराठी शाळेचे व ज.शि.प्र.मं.विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते .तसेच मोठ्या प्रमाणात या बालसभेला बालक , विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालसभेचे आभार प्रदर्शन प्रल्हाद जाधव यांनी केले.