भाटंबा शिवारात अवैध गौण उत्खनन प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

29

🔸ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीचे पाच टिप्पर जप्त

🔹गेल्या अनेक दिवसापासुन अवैधरित्या उत्खनन गौण करून या संदर्भात चौकशी करणे हि काळाजी गरज आहे
__________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.6जानेवारी):- शहरापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भाटंबा शेत शिवारात अवैध गौण उत्खनन प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याने दि.३ जानेवारी २०२३ रोजीच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान धडक कारवाई केली. त्या कारवाईत ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीचे पाच टिप्पर जप्त केले असून दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

भाटंबा येथील शेत सर्वे नंबर ३७ क्षेत्रफळ ३.४६ हेक्टर आर व शेत सर्वे नंबर ४१ क्षेत्रफळ ४.०५ हेक्टर आर या शेत जमिनीवर गिट्टी क्रेशर हॉट मिक्सिंग,बॅच मिक्स प्लांट, डिझेल पंप,लेबर कॅम्प वाहने तसेच अवैधपणे गौण खनिज उत्खनन करून ठेवलेले होते. त्याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेय एस. यांना माहिती कळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाच हायवे टिप्पर जप्त केले आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेय एस. यांनी रात्रीच्या वेळेला अवैधरीत्या गौण उत्खनन प्रकरणी कारवाई केल्याने संबंधिताचे धाबे दणाणले आहेत. यात विशेष बाब म्हणजे भाटंबा शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण उत्खनन सुरू असल्याची माहिती भाटंबाचे तलाठी व पुसदचे मंडळ अधिकारी यांना अनाधिकृत रित्या सुरू असल्याची माहिती असून देखील सहाय्यक जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

कारण,भाटंबा शेत शिवारामध्ये अकृषक जमीनीवर वापर सुरू झाल्याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी यांना कळविले नसल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागले आहे. अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेले असताना जबाबदार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी,तहसीलदार यांच्यावर कारवाई होणार का याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.

कंपनीवर २५ ते २७ लाख रुपयांचा दंड ठोकणार असल्याची माहिती

भाटंबा शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात गौणचे उत्खनन झाल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना दिसून आले आहे. रॉयल्टी पेक्षा जास्त उत्खनन झाल्यास ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला २५ ते २७ लाख रुपयाचा दंड ठोकणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी पाच हायवे टिप्पर पैकी एक विना नंबरच्या टिप्परसह एमएच ०५,ईल ३८७३,एमएच ०५,ईल ३८८०,एमएच ०५,ईल ३८८१ व एमएच ०५,ईल १३०६ क्रमांकाचे टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयासमोर उभे केले आहेत.