पूरग्रस्त भोई समाजाच्या पुनर्वसनाकरता तहसीलदार राळेगाव यांना निवेदन

25

🔹महाराष्ट्र प्रदेश भोई समाज संघ यवतमाळचे स्तुत्य पाऊलवाट

✒️सुनील शिरपुरे(यवतमाळ प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.6जानेवारी):-जुलै महिन्यातील अतिवृष्टीच्या पुरामुळे राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील भोई समाजाच्या वस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळे १७४ घराची पडझड होऊन आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे घराची पडझड होऊन आर्थिक नुकसान झालेल्या भोई समाजाच्या वस्तीचे मंजूर लेआउटमध्ये पुनर्वसन करावे व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत व्हावी. याकरिता महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळचे जिल्हाध्यक्ष श्री मारोतराव पडाळ यांच्या नेतृत्वात मा. तहसीलदार राळेगाव यांना निवेदन देण्यात आले. जुलै महिन्याच्या २७ तारखेला झाडगाव येथे नंदिनी नदीला आलेल्या महापुराचे पाणी झाडगाव येथील भोई समाजाच्या १७४ घरामध्ये पाणी शिरून घराची पडझड झाली. तसेच घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या होत्या.

त्या काळात त्या लोकांची एक आठवडा राहायची व खायची व्यवस्था दानशूर व समाजसेवकांनी केली होती. दरम्यान, महाराष्ट्राचे कृषिमंत्री मा.ना. दादा भुसे, विधानसभा विरोधी पक्ष नेते मा.ना. अजितदादा पवार व मा. अंबादास दानवे साहेब यांनी पूरग्रस्त झाडगाव येथील वस्तीला भेट देऊन पाहणी केली व पूरग्रस्तांचे त्वरित योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाला निर्देश दिले होते. परंतु आज सहा महिने पूर्ण होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत व पुनर्वसन करण्यात आले नाही. पूरग्रस्त भोई समाजाला पडक्या घरात राहून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळून मंजूर असलेल्या गट क्रमांक १७४ मध्ये त्वरित पुनर्वसन करावे.

याकरिता महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ जिल्हाध्यक्ष मारोतराव पडाळ यांच्या नेतृत्वात संघटनेचे सचिव महादेवराव वाघाडे, परसराम करलूके, हनुमानजी सातघरे, रामदासजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनात मा. तहसीलदार झाडगाव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भोई समाज संघटनेचे झाडगाव शाखा अध्यक्ष राजू मन्ने, उपाध्यक्ष गोपाल पारिसे, सचिव श्रीकृष्ण करलूके, सहसचिव शरद पारीसे, चंपतराव केरुदे, पळश्राम करलूके, कवडुजी मन्ने, दिलीप मन्ने, महादेव मन्ने, महादेवराव करलुके, हनुमान केरुदे, सूरज पचारे, समीर डोंगरे, आकाश करलुके, समीर डोंगरे, पवन केरुदे, गिरजाबाई पारीसे, कमलबाई पचारे, शेवंताबाई करलुके, लीलाबाई मन्ने, पुष्पाबई मन्ने, सुमित्राबाई मन्ने, सुनंदाबाई मन्ने, आशाबाई करलूके तसेच मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

राहुल मारोतराव पडाळ
कार्याध्यक्ष: म.प्र. भोई समाज सेवा संघ, युवा शाखा यवतमाळ