गटविकास अधिकारी अनिरुध्द सानप राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मानित

31

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.7जानेवारी):- पुरोगामी पत्रकार संघ व महिला विकास संघाच्या वतीने विविध आरोग्य क्षेत्रातील उत्तम काम तसेच उत्तम प्रशासन सांभाळल्याबद्दल, *गटविकास अधिकारी अनिरुध्द सानप यांचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मंगळवारी (दि. ३) माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, गटविकास अधिकारी अनिरुध्द सानप, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के , दिनेश लाला पवार,आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन डॉ. सुरेश साबळे यांचा गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना *गटविकास अधिकारी अनिरुध्द सानप म्हणाले, काही वर्षांपूर्वी कारभार हाती घेतल्यानंतर प्रशासकीय सेवेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, असे जाणिवपूर्वक प्रयत्न केले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे याला यशही आले. सामान्यांकडून यंत्रणेचे कौतुक होत असल्यानेच कामाला हुरुप येत आहे. गरिबांच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधानातच काम केल्याचे फलित मिळते.

माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, फारुक पटेल यांनीहीआले. अनिरुध्द सानप यांच्या पुढाकाराने पंचायत समिती सुधारलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचे कौतुक करण्यात आले.यावेळी किशोर पिंगळे, शारदा डुगलच, दिनेश पवार, डॉ. लक्ष्मण जाधव, सिमा ओस्तवाल आदींसह संयोजक भागवत वैद्य, डॉ.रमेश घोडके,राजेश ढेरे,अखिल फारुकी, दिनेश लाला पवार, डॉ. महावीर साहेब, यांची उपस्थिती होती. प्रास्तविक भागवत वैद्य मांडले आहे.सूत्रसंचलन शाहीर अनिल तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय दादा पोकळे यांनी मानले.