पत्रकार सदाशिव खटावकर यांचा आदर्शमाता प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार

26

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.7जानेवारी):-इंडियन प्रेस क्लब चे केंद्रीय सरचिटणीस सदाशिव खटावकर यांना मुंबई येथील निर्भीड पत्रकार नुकताच प्रदान करण्यात आला त्याचे निमित्ताने पाडळी (केसे ) येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे राज्य अध्यक्ष भानुदास माळी यांच्या हस्ते आणि प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.यावेळी आघाडीचे सातारा जिल्हा महासचिव, आय एम न्यूज चे संपादक शरद गाडे, राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, पत्रकार राजू सनदी,प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आनंदा बडेकर, प्रतिष्ठान चे पदाधिकारी यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.