माणसांतील “माणूसपण हरवलय” कविता संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

93

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.9जानेवारी):- अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभा राहणार सर्वसामान्य कार्यकर्ताच असतो. आंबेडकरी चळवळीत जॅकेट घालून मिरवणारा कार्यकर्ता विचारधारा सोडून स्वतःच्या स्वार्थासाठीच काम करतो, त्यामुळे तो कोणत्याही घटनेनंतर कायम आक्रमक भूमिका घेऊन पुढे जात नाही, तर तडजोड करून प्रसिद्धीत राहतो, त्यामुळे तो चळवळ मजबूत करण्यासाठी संघर्ष करतांना दिसत नाही. तर स्वताचे अस्तित्वात दाखविण्यासाठीच धडपडत असतो, म्हणूनच आज चळवळ गटातटात विभागलेली दिसते असे प्रा. वृषाली विनायक यांनी कवी प्रकाश कुमार प्रकाश जाधव जामसंडेकर तालुका देवगड यांच्या “माणूसपण हरवलय” या कविता संग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात वक्त्या म्हणून त्यांनी आपले सडेतोड मत व्यक्त केले.

लोककवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते कवी प्रकाश कुमार तथा प्रकाश जाधव जामसंडेकर तालुका देवगड यांच्या “माणूसपण हरवलय” या कविता संग्रहाचे उद्घाटन मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात दादर मुंबई येथे करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ.त्रिंबक दुनबळे होते. तर प्रमुख वक्ते काबुराज बोढारे, प्रा.वृषाली विनायक, विजय जाधव, सुरेखा पैठणे हे होते, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रदीप नाईक यांनी केले.

ज्याचे त्यांचे बाबासाहेब आणि ज्यांचे त्यांचे स्वतांचे गट हे समाजात शोधण्यासाठी माणसातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी आपले अनुभव “माणूसपण हरवलय” या कथा संग्रहात मांडले असे काबुराज बोढारे पँथर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. गटातठात कार्यकर्ते विभागले आहे पण समाज एकसंघ आहे. तो दरवर्षी धम्मचक्र परिवर्तन दिनी नागपुरात, महापरिनिर्वाण दिनी मुंबईत, आणि भिमा कोरेगावच्या विजय स्तंभावर लाखोंच्या संख्येने कशाची पर्वा न करता येतात.त्यांची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाते. हे आपण लक्षात न घेऊन बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था, संघटना व पक्षात सहभागी न होता गटबाजी वाढत चालली त्यामुळेच मोठे न भरून येणारे नुकसान समाजाचे होत आहे.अशी काबुराज बोढारे यांनी खंत व्यक्त केली.

कवीने स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कवीता लिहू नये,तर समाजात जे दिसते ते सत्य परिस्थिती कवी नी मांडले पाहिजे. फेकले गेलेल्या माणसाची लढाई लढता लढता कवी मनाचा कार्यकर्ता कणखर होऊन जातो. जगात गप्प बसणाऱ्याला जगता येत नाही. आणि ज्याला स्वस्थ बसून मरायचं नाही, तो जगण्याची भूमिका घेऊन संघर्षासाठी तयार होतो आणि शेवटच्या माणसांच्या हक्कासाठी लढतो, तीच वेथा “माणूसपण हरवलय” या निर्णयाला आलेला प्रामाणिक सर्व सामान्य कार्यकर्ता हे लिहू शकतो.असे लोककवी लोकनाथ यशवंत यांनी आपल्या उद्घाटना प्रसंगी सांगितले. आजचा कार्यकर्ता व नेता कसा आहे हे त्यानी दोन ओळीच्या कवितेतून मांडले. “बोकड म्हणतो मी खाटीकाचा खूप लाडका आहे. तो माझावर खूप प्रेम करतो.सर्वत शेवटी माझा नंबर लावणार आहे.” यावर सभागृहात प्रचंड टाळ्या वाजल्या.

अंधारात मशाल घेऊन चालणारा कार्यकर्ता, कवी बानूनच पुढे येत असतो, समाजात वावरताना अन्याय अत्याचारा विरोधात बोलणारा व लिहणारा हा कार्यकर्ताच असतो, तोच कवी, गायक, लेखक, प्रकाशक म्हणूनच पुढे येतो, त्यांच्या मागे हा समाज कायमस्वरूपी उभा राहतो असे डॉ. त्रिंबक दुनबळे यांनी सांगितले, माणसा मी असे गीत गावे ते माणसांचे असावे असे लोककवी गायक वामनदादा कर्डक यांनी लिहले होते. तेच खरे माणसांशी संवादातून संवाद साधणारे असावे, हेच कवी प्रकाश जाधव जामसंडेकर यांच्या “माणूसपण हरवलय” कथा संग्रहात स्पष्टपणे दिसते, सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून ते लिहले असावे, प्रकाश जाधव यांनी लिहले आहे तेच मला भावले.त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.असे डॉ.त्रिंबक दुनबळे यांनी सांगितले.रत्नगिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई रहिवाशांच्या वतीने प्रकाश जाधव व त्यांच्या पत्नीचा यावेळी सत्कार करण्यात आला.सदर प्रकाशन सोहळ्यात अनेक मान्यवर कवी,लेखक,पत्रकार,कार्यकर्ते उपस्थित होते.