कुंभारी येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

30

✒️तालुका प्रतिनिधी(स्वप्निल गोरे)

कुंभारी(दि.9जानेवारी):-मौजे कुंभारी येथील ग्रामपंचायत च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले याप्रसंगी गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ अर्चना दत्तात्रय w पवार उपसरपंच शेषराव नारायण ढोणे व तसेच सचिव अनिल काकडे तसेच ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य व शाळेतील मुख्याध्यापक श्री. गडदे सर, श्री. पोपळघट सर व सहाय्यक शिक्षक श्री. वाघमारे सर, श्री. चव्हाण सर, श्री. तारे सर ,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटक सादर करण्यात आले यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत सरपंच सौ अर्चना पवार यांनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचा विकास व त्यांचे अधिकार व हक्क याची जाणीव करून देत असताना समाजाच्या रूढी, प्रथा, परंपरा यांना दूर करून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला तो फक्त सावित्रीबाई फुले याच्या प्रयत्नातून मिळाले आणि महिलांना मान ,सन्मान व प्रतिष्ठा सुद्धा प्राप्त झाली आहे.

याप्रसंगी अनेक मुलांनी वेगवेगळ्या भूमिकेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नातूनच प्राध्यापक, इंजिनियर, वकील, शिक्षक, कर्मचारी, डॉक्टर्स, अशा अनेक भूमिकेतून गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. अर्चना पवार, कु. मयुरी राठोड, कु. शिल्पा राठोड, कु. ज्योत्स्ना राठोड, कु. प्रतीक्षा राठोड, कु. कोमल राठोड, कु. मनीषा पवार, कु. स्वाती पवार, कु.सोनू राठोड, कु. साधना जाधव, कु. कोमल राठोड, कु. अंकिता राठोड, व शैलेश राठोड यांनी आपला सहभाग नोंदविला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच गावातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदविला.