भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. नवपुते

29

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.10जानेवारी):-बहुजनांचे महानायक , कांतीकारक नेत्यांच्या विचारांशी निगडित आसलेली संघटना म्हणजे “भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ,, होय ही संघटना महाराष्ट्र राज्याच्या विविध काना कोप-यात भटके, विमुक्त, आदिवासी, एस.बी.सी. ओ.बी.सी. बहुजन चळवळीसाठी काम करत असुन या संघटनेच्या विभागीय बैठकीचे औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. तत्पुर्वी या ठिकाणी सविधानास पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात येऊन कार्यक्रमाचे प्रस्ताविक योगेश बन यांच्या भाषणाने होऊन संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

या वेळी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धनगाकर, मार्गदर्शक सोमनाथ धायडे, ग. ह. राठोड, एस. एन. ठाकुर, हाजी इर्शाद अशरफी अतार, स.सो. खंडाळकर डॉ. सुरेश शिंदे, संजय तुरे, डॉ. प्रभाकर नागलकर, डॉ. धर्मराज चव्हाण,मराठवाडा विभागीय अध्यक्ष योगेश बन, सत्यवती इंगळे,रोहिणी सोनार, शैला लोनकर, राजश्री जगताप, वनिता बनकर सुजाता आडे, कविता वंजारी, मिना खैरे, लता हारवळकर, यांच्या ऊपस्थितीत बीड जिल्ह्यातील भटके, विमुक्त, आदिवासी, एस.बी.सी, ओ.बी.सी बहुजन चळवळीच्या प्रश्नासाठी बीड जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा. चंद्रकांत नवपुते यांची निवड केल्याचे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.

प्रा. चंद्रकांत नवपुते यांचे सामाजिक कार्य पाहाता बीड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ते योग्य पध्दतीने हाताळुन वंचित घटकाला न्याय देऊ शकतात. या आणुषंगाने त्यांच्या निवडीला महत्व असुन प्रा. चंद्रकांत नवपुते यांच्या निवडीमुळे सर्व ऊपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचे शेवटी अशोक जाधव यांनी आभार मानले.