सिरपूर येथे थे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्य ग्रामगीता”भागवत सप्ताहा”चे आयोजन

25

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.11जानेवारी):-श्री गुरुदेव सेवा मंडळ सिरपूरच्या वतीने दिनांक १७ ते २४ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमानिशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्य ग्रामगीता भागवत संगितमय सप्ताहाचे आयोजन केले आहे. दिनांक १७ जानेवारीला सकाळी ११ वाजता ह. भ. प. मगरे महाराजांच्या हस्ते घटस्थापना होणार असून यावेळी गुरुभक्त वाघमारे महाराज उपस्थित राहतील. यावेळी ग्रामसफाई, सामुदायीक प्रार्थना, मार्गदर्शन होणार आहे.

या सप्ताहाच्या दरम्यान डॉ. राम गभणे, प्रा. राम राऊत, शैलेश्वरी वाघमारे, मंथन गायकवाड, प्राचार्य अर्चना अटळकर, हरिचंद्र नागपुरे, शंकर सुकारे, सुमित्रा चीखे, अरविंद देवतळे, प्रमोद पिसे, सोनवाने, रामदास सोयाम आदी मान्यवर सामुदायीक प्रार्थना व ध्यानाच्या महत्वावर मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक २४ जानेवारीला सकाळी ८ वाजता दामोधर बोरकर यांच्या उपस्थित रामधुन निघणार असून या प्रसंगी विठ्ठलराव सावरकर गुरुजी रामधुनपर मार्गदर्शन करतील. दुपारी १२ वाजता ह. भ. पं. राजेश ठाकरे महाराज अमरावती यांचे गोपालकाल्यावर किर्तन होईल. दुपारी २ वाजता राष्ट्रसंताच्या जीवनचरित्रावर चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, जिल्हा परिषद चंद्रपूरचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर, गुरुकुंज मोझरीचे आजीवन प्रचारक राजु देवतळे, प्रमुख भाजपाचे संदिप पिसे, माजी जि. प. सदस्य मनोज मामीडवार, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष माया ननावरे, सामाजिक कार्यकर्ता डॉ. श्याम हटवादे, चंद्रपूरचे प्रगतशील शेतकरी सचिन फेगडे, राजु कापसे, संजय डोंगरे, प्रा. राम राऊत, कमलाकर लोणकर, मनोहर पिसे, गणपत लांजेवार, निताई विश्वास, सरपंच वैशाली निकोडे, उपसरपंच राजेंद्र भानारकर, ग्रामसेवक भसारकर, नेहरु विद्यालय चिमुरचे भानारकर, माजी उपसभापती स्वप्नील मालके आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सिरपूरवासीयांनी केले आहे.