महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष व गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.निलेश बेलखेडे, तेली समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

28

🔸तेली युवक मंडळ ,चंद्रपुर आयोजित मेळाव्यात सत्कार समारंभ संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11जानेवारी):-महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष, गोंडवाना विद्यापिठ सिनेट सदस्य व तेली समाजाचे युवा, कार्यशील नेतृत्व प्रा, निलेश बेलखेडे, यांना तेली युवक मंडळ चंद्रपूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर आयोजित भव्य व़धु वर मेळावा २०२३ रोजी सत्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी, व समाजातील युवक युवतींन करीता राबविलेल्या उपक्रमाकरीता व सिनेट सदस्य निवडून आल्याबद्दल प्रा निलेश र बेलखेडे यांचा समाजभूषण पुरस्काराने माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार, चंद्रपुर विधानसभा आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार देवराव भांडेकर, तेली युवक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत खनके, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्य उपाध्यक्ष बबनरान फंड, समाजसेवक धनराज मुंगले, बावणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी संदर यशस्वी कार्यक्रमाबद्दल अभिनंदन व आयोजकांचे आभार मानतांना प्रा निलेश र बेलखेडे यांनी समस्त तेली बांधवाचा ऋणी राहिल व हा सन्मान सदैव समाजकार्यासाठी प्रेरणादायी असून यापुढेहि असचं समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समाज बांधवांची, युवा विद्यार्थी वर्गाना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहील असे मनोगत व्यक्त केले. यावेळी हजारोच्या वर तेली बांधव-भगिनींची उपस्थिती होते